द्वारकानाथ कोटणीस
द्वारकानाथ कोटणीस | |
---|---|
जन्म | सोलापूर १० ऑक्टोबर १९१० |
मृत्यू | ९ डिसेंबर १९४२ चीन |
राष्ट्रीयत्व | भारत |
नागरिकत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | मुंबई विद्यापीठ |
पेशा | वैद्य |
धर्म | हिंदू |
डॉ. द्वारकानाथ कोटणीस (ऑक्टोबर १०, १९१० - डिसेंबर ९, १९४२) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत