द्रास
द्रास | |
भारतामधील शहर | |
द्रास | |
द्रास | |
देश | भारत |
प्रदेश | लडाख |
जिल्हा | कारगिल |
समुद्रसपाटीपासुन उंची | १०,८०० फूट (३,३०० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३०,८७० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
द्रास हे भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगिल जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. लडाखचे प्रवेशद्वार समजले जाणारे द्रास श्रीनगर ते लेह दरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १ वर समुद्रसपाटीपासून १०,८०० फूट उंचीवर वसले आहे. द्रासच्या उत्तरेला पाकिस्तानचा गिलगिट-बाल्टिस्तान तर पश्चिमेला भारताचा जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहेत. द्रास येथील निसर्गसौंदर्यामुळे एक लोकप्रिय पर्यटनकेंद्र आहे. काश्मीर खोऱ्याला द्रासखोऱ्यासोबत जोडणारा झोजी ला हा घाट तसेच कारगिल शहर येथून जवळच स्थित आहेत. द्रास हे भारतामधील सर्वात थंड तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर मानले जाते. हिवाळ्यात येथील सरासरी किमान तापमान —२० °से असते.
१९९९ साली घडलेल्या कारगिल युद्धादरम्यान द्रासमध्ये धुमश्चक्री झाली होती.
बाह्य दुवे
विकिव्हॉयेज वरील द्रास पर्यटन गाईड (इंग्रजी)