द्रावण
रसायनशास्त्रानुसार, द्रावण म्हणजे दोन अथवा जास्त पदार्थांचे सहजासहजी अविभक्त न करता येण्याजोगे मिश्रण होय. अशा या मिश्रणात एक द्राव असतो ज्यात दुसरा पदार्थ विरघळतो.द्रावणात सहसा घन व तरल पदार्थ असतात. हे एकत्रित करण्यात आलेले मिश्रण त्यात समाविष्ट घटकांचे गुणधर्म घेते.मिश्रणात, द्राव अथवा द्रावक बहुदा जास्त प्रमाणात असतो. त्या द्रावणाची तीव्रता त्यात टाकण्यात आलेल्या पदार्थांच्या अनुपातावर अवलंबून असते.