दौंड जंक्शन रेल्वे स्थानक
दौंड मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | दौंड, दौंड तालुका, पुणे जिल्हा |
गुणक | 18°27′47″N 74°34′44″E / 18.46306°N 74.57889°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ५२१ मी |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग दौंड-मनमाड मार्ग दौंड-बारामती मार्ग |
फलाट | ७ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | 100 % |
संकेत | DD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
पुणे |
दौंड जंक्शन हे पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या दौंडमधून मनमाडकडे जाणारा फाटा फुटतो. ह्यामुळे पुण्याहून उत्तर व दक्षिणेकडील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या गाड्या दौंडमधूनच धावतात. पुणे उपनगरी रेल्वे सेवा दौंडपर्यंत चालवण्याची मागणी गेले अनेक वर्षे स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या
- पुणे – जम्मू तावी झेलम एक्सप्रेस
- पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- पुणे – पाटणा एक्सप्रेस
- पुणे – सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस
- पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
- हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा एक्सप्रेस
- कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
- नवी दिल्ली – बंगळूर कर्नाटक एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई मेल
- मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस
- मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
- मुंबई – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
- मुंबई – बंगळूर उद्यान एक्सप्रेस
- कुर्ला – कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेस
दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक (DDCC)
पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्यांसाठी २०२० मध्ये हे रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. या स्थानकाच्या निर्मितीपूर्वी पुण्याहून मनमाडकडे जाणा-या गाड्यांना दौंड जंक्शनमध्ये इंजिनची दिशा बदलण्यासाठी (सोलापूरकडून मनमाडकडे) ३० ते ४५ मिनिटे वेळ लागत असे. हा वेळ वाचवण्यासाठी पुणे - दौंड रेल्वेलाईन आणि दौंड - मनमाड रेल्वेलाईन यांना जोडणारी एक बायपास रेल्वेलाईन तयार करण्यात आली. आता पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्या दौंड जंक्शनमध्ये न जाता थेट या बायपास रेल्वेलाईनवर बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वे स्थानकामध्ये येतात आणि फक्त २-३ मिनिटे थांबून पुढे मार्गस्थ होतात.
दौंड जंक्शनपासून दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक हे ३ किमी अंतरावर आहे.दोन्ही रेल्वे स्थानकांदरम्यान रिक्षासेवा उपलब्ध आहे.