Jump to content

दोहा

दोहा
الدوحة‎ ad-Dawḥa
कतार देशाची राजधानी


दोहाचे कतारमधील स्थान

गुणक: 25°17′12″N 51°31′0″E / 25.28667°N 51.51667°E / 25.28667; 51.51667

देशकतार ध्वज कतार
स्थापना वर्ष इ.स. १८५०
क्षेत्रफळ १३२ चौ. किमी (५१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,५०,०००
  - घनता २,५७४ /चौ. किमी (६,६७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००


दोहा (अरबी: الدوحة) ही मध्यपूर्वेतील कतार ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दोहा शहर कतारच्या पश्चिम भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे १० लाख इतकी होती. दोहा हे कतारचे आर्थिक व राजकीय केंद्र असून कतार देशाची ६०% जनता दोहा महानगर परिसरात वसलेली आहे.

दोहामध्ये अनेक शैक्षणिक संस्था असून मध्यपूर्वेतील खेळांचे दोहा हे मोठे केंद्र आहे. २००६ आशियाई खेळांचे दोहा हे यजमान शहर होते. तसेच २०११ ए.एफ.सी. आशिया चषकातील अनेक सामने दोहामध्ये खेळवले गेले. २०२२ फिफा विश्वचषकाचे यजमानपद कतारला देण्यात आले असून त्यामधील बहुतेक सामने दोहामध्ये आयोजित करण्यात येतील.

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दोहाजवळील विमानतळ कतारमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कतार एअरवेज ही कतारची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी येथूनच जगातील १४५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

बाह्य दुवे