Jump to content

दोन स्पेशल

दोन स्पेशल हे मराठी नाटक आहे.

नाट्य-चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी आणि निर्माते संतोष कणेकर यांची निर्मिती असलेल्या 'दोन स्पेशल' या नाटकात पत्रकारिता, तीत झालेली स्थित्यंतरे आणि सामान्यजनांच्या जगण्याशी असलेला त्यांचा अन्योन्य संबंध चितारण्यात आला आहे. बिकट परिस्थितीत लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ पत्रकारितेद्वारे जपू पाहणाऱ्या एका पत्रकाराच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षांची कहाणी या नाटकात उलगडत जाते.

ह.मो. मराठे यांच्या न्यूझ स्टोरी या मूळ कथेवर आधारित या नाटकात एका पत्रकाराची तत्त्वनिष्ठा आणि एका विचित्र जीवघेण्या परिस्थितीत त्याच्या पुढय़ात येऊन उभ्या राहिलेल्या त्याच्या एकेकाळच्या प्रेयसीचा जगण्याचा संघर्ष यांतले थरारक द्वंद्व मांडण्यात आले आहे. यानिमित्ताने माणसाचे जगणे महत्त्वाचे की पत्रकारितेतील तत्त्वनिष्ठा, असा अत्यंत अवघड प्रश्न या नाटकातून ऐरणीवर आणला गेला आहे.

नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी उभारलेले १९८९ सालातील पुण्यामधील एका वृत्तपत्राच्या कार्यालयाचे वास्तवदर्शी नेपथ्य आणि त्यांनीच प्रकाशयोजनेतून जिवंत केलेले तत्कालीन काळाचे संदर्भ हेही या नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. या नाटकात जितेंद्र जोशी, गिरीजा ओक-गोडबोले आणि रोहित हळदीपूर यांनी भूमिका वठवल्या आहेत.