Jump to content

दोड्डा केम्पदेवराज वोडेयार

दोड्डा केम्पदेवराज वोडेयार
मैसुरुचा १३वा राजा
अधिकारकाळ१६५९-१६७३
अधिकारारोहण१६५९
राज्याभिषेक१६५९
राजधानीमैसुरु
जन्म२५ मे, १६२७
मृत्यू११ फेब्रुवारी, १६७३
पूर्वाधिकारीकांतीरव नरसराज
' चिक्क देवराज
उत्तराधिकारीचिक्क देवराज
वडीलदेवराजेन्द्र वोडेयार
आईकेम्पामांबा अम्मानी अवरु
राजघराणेवडियार घराणे
धर्महिंदू

पहिला देवराज वोडेयार तथा दोड्डा देवराज (२५ मे, १६२७ - ११ फेब्रुवारी, १६७३) हा मैसुरुचाचा १३वा राजा होता. हा १६५९ ते १६७३ पर्यंत तेरावा राजा होता [] हा देवराजेन्द्र वोडेयारचा मुलगा असून कांतीरव नरसराजच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.

पूर्वजीवन

दोड्डा देवराज देवराजेंद्र वोडेयार आणि त्याची दुसरी पत्नी केम्पामंबा अम्मानी अवरु यांचा चौथा मुलगा होता. १६३८ मध्ये त्याचा चुलत भाऊ पहिला कांतीरव नरसराजा राजा झाल्यावर त्याला त्याच्या वडिलांसोबत हेंगुल किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. २८ जुलै, १६५९ मध्ये तो दत्तक गेला व त्याला युवराज केले गेले. ३१ जुलै, १६५९ कांतीरवच्या मृत्यूनंतर तो सत्तेवर आला आणि १९ ऑगस्ट, १६५९ रोजी त्याचा राज्याभिषेक झाला.

राजवट

दोड्डा देवराज राजा असताना विजयनगरचा शेवटचा सम्राट तिसरा श्रीरंग दख्खनी सल्तनतींपासून पळून श्रीरंगपट्टण जवळच्या बेदनूर येथे आला. [] त्याच्या मागोमाग केल्लाडीचा शिवप्पा नायक मोठे सैन्य घेउन श्रीरंगचे साम्राज्य श्रीरंगपट्टणयेथे उभारण्यासाठी चालून आला.[] देवराजने हा हल्ला परतवून लावला आणि हल्लेखोरांचा पश्चिमेकडील मलनाड पर्यंतपाठलाग केला आणि त्यांचा प्रदेश जिंकून घेतला. [] विजयनगर आपल्यावर उलटलेले पाहून देवराजने विजयनगरवरील आपली नाममात्र निष्ठा काढून घेतली आणि मैसुरुला सार्वभौम राज्य घोषित केले. [] यानंतर लगेचच मदुरैच्या नाईकांनी मैसुरुवर चाल केली पण शिवप्पा नायकाप्रमाणे देवराजने हा हल्ला परतवून लावत त्याचा पाठलाग करीत मदुरैवर चाल केली. येथील तहात देवराजने इरोड आणि धारापुरम मैसुरुमध्ये घेतले आणि त्रिचनापल्लीच्या राजाकडून खंडणी वसूल केली. []

दोड्डा देवराज वोडेयार ११ फेब्रुवारी, १६७३ रोजी चिकनायकनहळ्ळी येथे मृत्यू पावला. या वेळी त्याने आपले राज्य दूरपर्यंत विस्तारले होते[] आणि आपली सद्दी दक्षिणेला कोईम्बतूरजवळील धारापुरम, पश्चिमेला साक्रेपटना आणि पूर्वेला सेलेमपर्यंत पोचवली होती. []

नोंदी

संदर्भ