दोंगुवान
दोंगुवान 东莞市 | |
चीनमधील शहर | |
दोंगुवान | |
देश | चीन |
प्रांत | क्वांगतोंग |
स्थापना वर्ष | इ.स. ३३१ |
क्षेत्रफळ | २,४६५ चौ. किमी (९५२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६ फूट (७.९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,०४,६६,४२५ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://www.dg.gov.cn/ |
दोंगुवान (देवनागरी लेखनभेद : दोंग्वान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदीच्या खोऱ्यामध्ये क्वांगचौच्या दक्षिणेस तर षेंचेनच्या उत्तरेस वसले असून २०२० साली दोंगुवान शहराची महानगरी लोकसंख्या सुमारे १ कोटी ४ लाख इतकी होती.
आजच्या घडीला दोंगुवान चीनमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये गणली जाते तसेच जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दोंगुवान येथेच बांधला गेला आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील दोंगुवान पर्यटन गाईड (इंग्रजी)