Jump to content

देवेंद्रनाथ टागोर

देवेंद्रनाथ टागोर

देवेंद्रनाथ टागोर (१५ मे, इ.स. १८१७: शिलैदाहा, कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत - १९ जानेवारी, इ.स. १९०५: कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत) हे भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.

कौटुंबिक माहिती

देवेंद्रनाथ हे द्वारकानाथ टागोर यांच्या सहा मुलांपैकी एक होते. देवेंद्रनाथ यांच्या मुलांपैकी अनेकांनी स्वतःची ख्याती मिळविली.

  • द्विजेंद्रनाथ टागोर हे कवी, संगीतकार आणि विद्वान होते. यांनी बंगालीमध्ये लघुलेखन आणि सांगितिक संज्ञा (म्युझिकल नोट्स) आणल्या.
  • सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय नागरी सेवेत रुजू होणारे सर्वप्रथम भारतीय होते.
  • हेमेंद्रनाथ टागोर हे योगी आणि ब्रह्मोसमाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.
  • ज्योतिंद्रनाथ टागोर हे संगीतकार आणि नाट्यकलावंत होते.
  • रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक विजेते कवी होते. यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतिनिकेतनची स्थापना केली.
  • सौदामिनी टागोर या लेखिका होत्या.
  • स्वर्णकुमारी टागोर या लेखिका, कवियित्री आणि समाजसेविका होत्या.