Jump to content

देवी (रोग)



देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे - ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात[]. त्या पुयां मध्ये

पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात. ब्रिटिश डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत.

देवी रोग
देवी रोग ने ग्रासित रुग्ण
कारणे Variola ( व्ह्यारीओला) या विषाणु मुळे होतो.
प्रतिबंध देवी रोगाची लस

देवी रोगाचा इतिहास

भारतात देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगाचे खूप खूप भय होते. देवी रोगावर लस, औषधे उपलब्ध नव्हते. १८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावत आणि २५% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे होत.[]

देवी या रोगाची पुरातन मान्यता

देवी रोग हा देवीच्या कोपा मुळे होतो अशी मान्यता होती त्यामुळे या रोगास देवी रोग हे नाव पडले. १९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते. मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे. हा रोग देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो. हा विषाणूजन्य रोग आहे.

शितलादेवी

लक्षणे

रुग्णाला ताप येणे, थंडी वाजणे, स्नायू दुखी ही लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात, पुरळ शरीरभर पसरतात. पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो, अंधत्व येते. नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो. या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.

संशोधन कार्य

ब्रिटिश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "देवी (Small pox)". Loksatta. २२/२/१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ रीडेल, स्टीफन. "एडवर्ड जेन्नर आणि देवी रोगाचा इतिहास". https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1200696/. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-02-19. २४ फेबरुवारी २०२० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)