Jump to content

देवानंद बाबूराव शिंदे

डॉ. देवानंद बाबूराव शिंदे यांची जून २०१५ कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.

शिंदे शिवाजी विद्यापीठात यांनी विभागप्रमुख, परीक्षा मंडळ, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ, खरेदी समिती, संशोधन अधिमान्यता समिती, अभ्यास मंडळ अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सोळाहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना रसायनशास्त्र, वैद्यकीय रसायनशास्त्र तसेच औषधरचनाशास्त्र या विषयांच्या अध्यापन व संशोधन मार्गदर्शनाचा २५ वर्षांचा अनुभव आहे.

देवानंद शिंदे हे ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. स्वित्झर्लंडमधील व अमेरिकेतील संस्थांची त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. त्यांच्या नावावर तीन पेटंटे आहेत; तर ११० परिषदांमध्ये त्यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत.

चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ‘साहित्य निर्मितीत तंत्रज्ञानाचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला होता. सध्या त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य् पदी झाली आहे