Jump to content

देवससाणा

Falco naumanni back crop
Common Kestrel (Falco tinnunculus) in Kinnarsani WS, AP W IMG 6037

देवससाणा (इंग्लिश: European Kestrel; हिंदी:करोंतिया, कोरुत्तीया, विलायती केमुटिया; गुजराती:लार्झी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे कबुतरासारखा परंतु बारक्या चणीचा असतो. वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो. खालच्या भागाचा रंग बदामी असतो. त्यावर भल्याचा पत्त्याच्या आकाराचे खुणा असतात. टोकदार पंख असतात. तोल काळे व शेपटी करडी असते. गोलसर शेपटीचे टोक काळे असतात. मादी: तांबूस रंगाची असते . डोके व मानेवर आडवे पट्टे असतात. उजाड रानात एखाद्या काठीवर बसलेला किंवा हवेत तरंगणारा आढळतो .

वितरण

भारत(India) , श्रीलंका(Sri lanka) , मालदीव(Maldives) , लक्षद्वीप(lakshyadweep)आणि अंदमान (Andaman) बेटात हिवाळी पाहुणे असतात. पाकिस्तानातील वायव्य सरहद प्रांत ते बलुचिस्थान आणि पंजाब ह्या भागात पर्वतीय आणि भारतात पश्चिम हिमाचल प्रदेशात वीण भागात आढळतात

निवासस्थाने

माळराने आणि शहराजवळी भागात आढळतात

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली