देवयानी फरांदे
प्रा.सौ.देवयानी सुहास फरांदे विद्यमान आमदार | |
शिक्षण | एम.एस.सी मायक्रो बायोलॉजी,पुणे विद्यापीठ , पी.एच.डी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ |
---|
राजकीय कारकीर्द
- गेल्या ३० वर्षांपासून 'भारतीय जनता पक्षाच्या' निष्ठावंत कार्यकर्त्या
- महाविद्यालयीन जीवनात "जनरल सेक्रटरी" म्हणून काम सांभाळले .
- सन १९९७ ते सन २०१४ या कालावधीत ३ वेळा नाशिक महानगरपालिका "नगरसेवक" म्हणून उल्लेखनीय काम
- सन २००९ ते सन २०१२ या कालावधीत नाशिक महानगरपालिका "उपमहापौर" म्हणून भरीव कामगिरी
- सन २००४ ते २०१३ या कालावधीत महिला मोर्चा प्रदेश चिटणीस पद भूषविले.
- अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळे विधानसभा पक्ष प्रतोद पदी निवड
- महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्या
- सन २०१५ च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनातील सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती
- सन २०१९ मध्ये नाशिक विधानसभा (मध्य) मतदार संघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड
- लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून ख्याती
उल्लेखनीय कामे
- नाशिक औद्योगिक क्षेत्र विकासासाठी उद्योजकांना सवलतीत वीज पुरवठा मिळण्यासाठी विधानभवनात आवाज उठविला.
आमदार देवयानी फरांदे यांनी धान्य वितरणाचा 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून दिला त्याची दखल तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीश बापट यांनी घेत यंत्रणेतील दोष दूर करत धान्य पुरवठा सुरळीत केला.
सामाजिक योगदान
- वुमन्स फोरेन आणि दुर्ग विकास महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील
पुरस्कार
- नाशिक सिटीझन फोरमतर्फे "आदर्श नगरसेविका" पुरस्काराने सन्मानित
- महात्मा फुले समाज विकास संस्था, नाशिक यांच्यावतीने "दिव्य ज्योती" पुरस्काराने सन्मानित