Jump to content

देवबंदी

देवबंदी (Deobandi) हा सुन्नी इस्लामचा उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद या जिल्ह्याच्या नावावरून विचारप्रवाहाला हे नाव मिळाले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी १८६६ मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली.

देवबंद विचारप्रवाहाच्या प्रचारात मौलाना अब्दुल रशीद गंगोही, मौलाना कासिम ननोतवी आणि मौलाना अशरफ अली थानवी यांची भूमिका निर्णायक आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तान या देशांत राहणारे बहुतांशी मुसलमान देवबंद विचारप्रवाहाशी संबंधित आहेत. देवबंदी या उपपंथांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार कुराण आणि हादीस हे पवित्र धर्मग्रंथच शरियतचे मूलाधार आहेत. मात्र यासाठी इमामांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शरियतचे कायदे इमाम अबू हनीफा यांच्या विचारांनुसार आहेत. देवबंद विचारपंथानुसार अल्लानंतर नबी महत्त्वाचे आहेत. पण, नबी हे मानव आहेत असे ते मानतात.

हे सुद्धा पहा