Jump to content

देम्यान्स्क

देम्यान्स्क हे रशियाच्या नोव्होगोरोड ओब्लास्तमधील छोटे शहर आहे. हे देम्यान्स्क जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून येथील लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,३६५ इतकी होती.

हे शहर लेनिनग्राडजवळ आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे नाझी जर्मनीच्या छोट्या शिबंदीने सोवियेत संघाच्या मोठ्या सैन्याशी लढून सुटका करून घेतली होती.