देखिला अक्षरांचा मेळावा (पुस्तक)
देखिला अक्षरांचा मेळावा | |
लेखक | विजय पाडळकर |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | रसग्रहण |
प्रकाशन संस्था | जनशक्ती वाचक चळवळ |
प्रथमावृत्ती | इ.स. १९८६ |
चालू आवृत्ती | १ ऑगस्ट, इ.स. २००९ |
मुखपृष्ठकार | सरदार |
पृष्ठसंख्या | १४४ |
पुरस्कार | वाल्मिक पुरस्कार |
देखिला अक्षरांचा मेळावा हे विजय पाडळकर यांनी लिहिलेले पुस्तक असून इ.स. १९८४ साली वर्षभर 'मराठवाडा' दैनिकाच्या रविवार पुरवणीत 'अक्षरसंगत' या नावाने लिहिलेल्या सदरातील लेखांचे संकलन आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती इ.स. १९८६ साली स्वयंप्रभा प्रकाशनाने प्रकाशित केली तर औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १ ऑगस्ट, इ.स. २००९ रोजी प्रकाशित केली. पाडळकरांच्या या पुस्तकाला 'वाल्मिक पुरस्कार' मिळाला होता.
अर्पणपत्रिका
उठून गेलेल्या जिवलगांसाठी