Jump to content

देअर श्पीगल

देअर श्पीगल
प्रकार साप्ताहिक
विषय बातम्या
भाषा जर्मन
संपादक माथियास म्युलर फॉन ब्लुमेनक्रोन व गेओर्ग मास्कोलो
खप १०,५०,०००/आठवडा
प्रकाशक श्पीगल-फेर्लाग
पहिला अंक जानेवारी ४, १९४७
देश जर्मनी ध्वज जर्मनी
मुख्यालय हॅंबुर्ग
संकेतस्थळ श्पीगल.डीई
ISSN {{ [http://worldcat.org/issn/0038-7452 0038-7452 0038-7452]}}

देअर श्पीगल (अर्थ: 'आरसा') हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील हॅंबुर्ग शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरित होतात.

पहिल्या महायुद्धापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पीगल' नावाचे एक पत्रक म्युनिकमधून प्रसिद्ध केले. या श्पीगलचे पहिले प्रकाशन जानेवारी ४, १९४७ साली हॅनोव्हर मधून प्रसिद्ध झाले. रुडॉल्फ आउगस्टाइन यांनी श्पीगलच्या पहिल्या अंकापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत (नोव्हेंबर ७, २००२) या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले.


बाह्य दुवे

  • Spiegel.de साप्ताहिकाचे संकेतस्थळ