दृष्टिपटल
दृष्टिपटल (लॅटिन:Retina, रेटिना) हा डोळ्यातील सर्वात आतील प्रकाशाला संवेदनशील ऊतीचा थर आहे. डोळ्यात दृश्य जगाची प्रतिमा दृष्टिपटलावर बनते. दृष्टिपटलावर प्रकाश पडल्यावर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रासायनिक आणि विद्युत प्रक्रिया सुरू होतात, ज्यामुळे आवेगचेतनी निर्माण होतात. हे आवेगचेतनी दृश्य मज्जातंतूद्वारे मेंदूच्या दृष्टीशी संबंधीत केंद्रांपर्यंत पोहोचवले जातात व आपल्याला प्रतिमा दिसते.