दुर्गाबाई शिरोडकर
दुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यांच्या शिष्या होत्या. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडा गावी झाला. सुमन, मधुरा आणि उमाकांत या तीन मुलांच्या जन्मानंतर त्या मिरजेला राहिल्या. नंतर पुण्यात स्थायिक झाल्या. पुणे, मुंबई, लखनौ आणि दिल्लीमध्ये दुर्गाबाईंनी संगीताचे बरेच कार्यक्रम केले. यमन आणि ललत हे दुर्गाबाईंचे आवडते राग होते. बालगंधर्वांनी एकदा दुर्गाबाईंच्याकडे येऊन 'यमन' ऐकला होता.
नाट्यसृष्टीतली कामगिरी
वि.वि. बोकील यांनी लिहिलेल्या नर्मविनोदी, हलक्या फुलक्या 'मीना-नीना' नावाच्या नाटकात दुर्गाबाईंनी गायिका असलेल्या नायिकेची भूमिका केली होती.
कौटुंबिक माहिती
- पती - अशोककुमार सराफ
- मुलगी - सुमन भोसले (गायिका)
- दुसरी मुलगी - मधुरा गुप्ता
- मुलगा - उमाकांत (फोटोग्राफर)
- जावई - नरेंद्र भोसले (चित्रकार)
- नातू - सुदेश भोसले (गायक)
- नात - तनुजा गुप्ता (ऊर्फ गुडी)
- पणतू - सिद्धान्त (गायक)
पुरस्कार
- अजोड गायनशैलीसाठी दुर्गाबाईंना राष्ट्रपतीपदक देऊन गौरविण्यात आले होते.