Jump to content

दुर्गानंद गायतोंडे

दुर्गानंद गायतोंडे हे एक इंग्लिश आणि मराठी साहित्यिक आहेत. त्यांची सर्व पुस्तके किंडलवर उपलब्ध आहेत.

पुस्तके

  • अंतरीच्या नाना कळा : कथा आणि व्यथा (विविध व्यवसायांतील व्यक्तींच्या मुलाखतींचा आणि संभाषणांचा संग्रह)
  • आभास (कथासंग्रह)
  • ओंकारमय व्हा (आध्यात्मिक)
  • कवडसे (यशवंत चंद्रचूड, भानुमती कोमकली, निर्मलादेवी, साम्यवादी नेते ए.बी. बर्धन आणि इतर पाचजणांची व्यक्तिचित्रणे असलेले पुस्तक)
  • गूढ (कादंबरी)
  • थरार (थरारकथांचा संग्रह)
  • पराधीन आहे पुत्र मानवाचा (वयाच्या ९३व्या वर्षी लिहिलेला कथासंग्रह)
  • पुनर्जन्मा ऐक तुझी कहाणी
  • भावलेल्या व्यक्ती (सहचरी पत्नी, ऑस्ट्रेलियातील माजी राजदूत अप्पासाहेब पंत, महात्मा गांधी यांच्या निकट सहकारी-सुशीला पै, मिस्किल लेखक बापू प्रभावळकर, आणि इतर सातजण यांच्या व्यक्तिचित्रणांचा संग्रह)
  • येरा गबाळाचे काम नोहे (रहस्यमय कादंबरी)
  • Rebirth a Study in Depth (२००७)
  • सुंदरा मनामध्ये भरली (कथासंग्रह). हा कथासंग्रह लिहिला तेव्हा गायतोंडे शंभरीच्या घरात होते.