दुधी भोपळा


दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.
इतर वापर
दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्त्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.
बिया
वाद्ये बनविण्यासाठी वापर
दुधी भोपळ्याचे फूल
भांडे म्हणुन वापर
दिवा
दुधी भोपळ्यापासुन बनविलेला एक प्रकारचा दिवा
दुधी भोपळ्याच्या बीया(इंग्रजीत: Lagenaria siceraria var peregrina)
संग्रहालयातील नमूना
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- गूर्ड-झेट.कॉम - दुधी भोपळ्याविषयी माहिती, बातम्या (इंग्लिश मजकूर)