दुदुमा धबधबा
दुदुमा धबधबा हा ओडिशामधील मचकुंद नदीवर असून त्याची उंची १५७मी आहे. हा दक्षिणेतील मोठा धबधबा असल्यामुळे या धबधब्यावर मचकुंद हा जलविद्युत प्रकल्पसुद्धा आहे. तसेच हे महत्त्वाचे असे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. ओंनुकूडेली नावाची एक सुंदर वसाहत येथे विकसित झाली आहे. हा धबधबा कोरापूटपासून (ओडिशा) ९२ किमी व विशाखापट्टणमपासून (आंध्रप्रदेश) जवळपास २०० किमी अंतरावर आहे. या प्रदेशात 'बोन्डा' हे आदिवासी जमात राहतात. हा ओडिशा व आंध्रप्रदेश राज्यातील सीमेचा भाग असून दोन्ही बाजूला याचे उपधबधबे आहेत.