दीपक पुनिया (पैलवान)
दीपक पुनिया (क्रिकेट खेळाडू) याच्याशी गल्लत करू नका.
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जन्मदिनांक | १९ मे, १९९९ |
जन्मस्थान | छारा, झज्जर जिल्हा, हरयाणा |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | फ्रीस्टाइल कुस्ती |
नायब सुबेदार दीपक पुनिया हा भारतीय पैलवान आहे. याने २०१९ जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्रीस्टाइल ८६ किलो गटात रौप्य पदक जिंकले आणि २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.[१] पुनिया त्याच्या वजन प्रकारात विद्यमान राष्ट्रकुल विजेता आहे. २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. [२] [३] [४]
पुनिया भारतीय सैन्यात जुनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) आहे.
संदर्भ
- ^ "World Championships: Deepak Punia 4th Indian wrestler to bag 2020 Olympics quota". India Today. 20 September 2019. 21 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "CWG 2022: Deepak Punia Wins Gold in Men's 86 Kg Category in Birmingham". News18 India (इंग्रजी भाषेत). 2022-08-05.
- ^ "Who is Deepak Punia? Know the Indian wrestler". Olympics.com. 18 Aug 2022. 7 Oct 2023 रोजी पाहिले.
- ^ Nalwala, Ali Asgar (7 Oct 2023). "Asian Games 2023 wrestling: Deepak Punia wins silver medal in Hangzhou". Olympics.com. 7 Oct 2023 रोजी पाहिले.