दि अल्केमिस्ट
'दि अल्केमिस्ट' ही कादंबरी १९८८ साली प्रथम प्रकाशित झाली, ज्याचे लेखक आहेत 'पाउलो कोएल्हो' जे मूळचे ब्राझीलियन. ही कादंबरी मूलतः पोर्तुगीज भाषेत लिहिली गेली. पुढे अनेक भाषांमध्ये तिचे अनुवाद झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ती प्रसिद्धीस पावली. त्याचा मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले यांनी केला. ह्याची मराठी प्रथम आवृत्ती १५ ऑगस्ट २००४ साली प्रकाशित झाली. ही काल्पनिक कादंबरी एका तरुण मेंढपाळाचा खजिन्याच्या शोधाचा प्रवास दाखवते.
कथानक :
'दि अल्केमिस्ट' या पुस्तकाचा नायक 'सॅन्टियागो' नावाचा एक मेंढपाळ मुलगा आहे. त्याला एका खजिन्याचे स्वप्न पडते. तो जवळच्या शहरातील भविष्य जाणू शकणाऱ्या एका स्त्रीला त्या स्वप्नाबद्दल विचारतो. स्त्री त्या स्वप्नाचा असा अर्थ सांगते की त्याला "इजिप्शियन पिरॅमिड' येथे एक खजिना सापडेल.
आपल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, त्याला मल्कीसेदेक नावाचा एक वृद्ध राजा भेटतो, जो खरेतर 'सालेमचा राजा' असतो. तो नायकाला इजिप्तला जाण्यास प्रोत्साहन देतो आणि त्यासाठी आपली मेंढरे विकायला सांगतो.
आफ्रिकेला आल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात एक माणूस त्याला भेटतो. तो सॅन्टियागोला पिरॅमिड्सकडे नेण्यास सक्षम असल्याचा दावा करतो. कथानायक देखील त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण तो माणूस त्याचा विश्वासघात करून नायकाचे मेंढरांची विक्री करून आलेले पैसे लुटून पळून जातो. आता तो पुढचा प्रवास कसा करणार? म्हणूनच सॅन्टियागो नंतर क्रिस्टल व्यापाऱ्यासाठी काम करण्यास सुरुवात करतो, जेणेकरून पिरॅमिड्सकडे जाण्यासाठी पुरेसे पैसे मिळू शकतील.
पुढील वाटेवर मुलाची भेट एका इंग्रज माणसाशी होते जो किमयागाराच्या शोधात आला आहे. पुढे त्याचा ह्याच्या साथीने प्रवास सुरू होतो. जेव्हा ते मरुवनात पोहोचतात तेव्हा सॅन्टियागो फातिमा नावाच्या एका अरबी मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्यापाशी तो लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. पण हा प्रवास संपल्यानंतरच ती लग्न करण्याचे वचन देते. सुरुवातीला तो निराश होतो, पण त्याला नंतर समजते की हे जर खरे प्रेम असेल तर ते कुणीही आपल्यापासून दूर करू शकणार नाही.
त्या मुलाचा सामना पुढे एका किमयगाराशी होतो, जो त्याला काही अनुभवपूर्ण ज्ञान देतो. पुढे एकत्रितपणे ते युद्ध करणाऱ्या आदिवासींच्या प्रदेशातून जात असतात. त्यांना जर तिथून पुढे जायची परवानगी हवी असेल तर त्याला स्वतःला सिमूमध्ये बदलून 'जगाचा आत्मा' दाखवून आपले ऐक्य आणि सामर्थ्य दाखवण्यास भाग पाडणे क्रमप्राप्त असते. त्या दिव्यातून तो पुढे जातो. पिरॅमिड्स नजरेत येताच तो पुन्हा खोदण्यास सुरुवात करतो, तेव्हा त्याला पुन्हा लुटले जाते, परंतु ह्या सगळ्यात चोरांच्या नेत्याकडून त्याला अनावधानाने समजते की तो ज्या खजिनाचा मागोवा घेत इथवर आलेला होता तो खजिना तर जिथे त्याला खजिन्याचे स्वप्न पडले होते, त्या पडक्या चर्चमध्येच होता .
पार्श्वभूमी :
कोएल्हो यांनी १९८७ मध्ये केवळ दोन आठवड्यांत 'दि अल्केमिस्ट' ही कादंबरी लिहिली. त्यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात लिहिले आहे की "ही कथा या गतीने लिहून झाली कारण ही कथा त्यांच्या आत्म्यात आधीच लिहिली गेली आहे."
पुस्तकाचा मुख्य गाभा एखाद्याचे भाग्य शोधण्याविषयी आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, 'दि अल्केमिस्ट ही कादंबरी साहित्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला मदत करणारी अधिक आहे.' कादंबरीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ भाग आणि त्या संपूर्ण भूमिकेतून येणारा हेतू हा सॅन्टियागोला दिलेला सल्ला आहे की 'जेव्हा आपल्याला खरोखर काहीतरी घडवण्याची इच्छा असेल तेव्हा संपूर्ण विश्व ते पूर्णत्वास नेण्यास आपल्याला मदत करेल, जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल.'
प्रसिद्धी :
'दि अल्केमिस्ट'ला प्रथम ब्राझीलच्या 'रोक्को' नावाच्या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले. एका वर्षानंतर प्रकाशकाने ह्या पुस्तकाची विक्री 'बरी' होत असल्याने त्याचे हक्क कोएल्हो यांना परत देण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून स्वतःला सावरण्यासाठी कोएल्हो 'रिओ दि जानेरोला' आपल्या पत्नीसमवेत निघाले आणि त्यांनी चाळीस दिवस मोजवे वाळवंटात वास्तव्य केले. तिथून परत आल्यावर त्यांनी ठरवले की हे पुस्तक चांगले आहे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि मग त्यांनी अनेकांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली.
१९९४ मध्ये 'अलेक्झांड्रे जुब्रान' यांनी याचे एक कॉमिक रूपांतर प्रकाशित केले होते. हार्परवन यांनी या कादंबरीची सचित्र आवृत्ती तयार केली, ज्यात फ्रेंच कलाकार मॉबियस यांनी चित्रे काढली होती, परंतु कोएल्हो यांच्याकडून ते संपूर्ण कादंबरी ग्राफिक स्वरूपात प्रकाशित करण्याच्या आपल्या इच्छेस ते संमती मिळवू शकले नाहीत.
२००२ मध्ये लंडनला 'दि अल्केमिस्ट'चे नाट्य रूपांतर सादर केले गेले. तेव्हापासून 'कॉर्निश कलेक्टिव' यांनी त्यातून बरीच निर्मिती साधली. २००९ मध्ये अश्विन गिडवाणी प्रॉडक्शनने या कादंबरीचे भारतीय रूपांतरण केले.
संगीत क्षेत्रात सुद्धा 'दि अल्केमिस्टने' अनेक बँडसना प्रेरित केले आहे. १९९७ साली 'आरसीए रेड सीलने' संगीतकार वॉल्टर तायब यांच्या साथीने सीडी बुकलेटसाठी मूळ मजकूर लिहिलेल्या पाउलो कोएल्होच्या समर्थनासह 'अल्केमिस्ट्स सिम्फनी'ची निर्मिती केली. सप्टेंबर २००९ मध्ये, न्यू यॉर्कमधील 'आंच चेस्ड' सभागृहात एक संगीत मैफल पार पडली. 'दि अल्केमिस्ट'पासून प्रेरित होऊन संगीतकार सुंग जिन हॉंग यांच्या लग्नासाठी 'वन वर्ल्ड सिम्फनी' यांनी अशाच एका वाद्यवृंदाची निर्मिती केली.