Jump to content

दि.य. देशपांडे

प्रा. दि.य. देशपांडे(जन्म : २४ जुलै, इ.स. १९१७, - ३१ डिसेंबर, इ.स. २००५) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवाद नावाची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्‍न केला. त्यासाठी त्यांनी एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक हे मासिक सुरू केले. आपल्या पत्‍नी विदुषी मनू गंगाधर नातू यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांनी हे मासिक सुरू केले.[] बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वचिंतक म्हणून ते प्रसिद्ध होते. तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले. ते नाना म्हणूनही ओळखले जात. नागपूर विद्यापीठात सांकेतिक तर्कशास्त्र हा विषय सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांचे सहकारी, मित्र आणि तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्र. ब. कुळकर्णी यांनी 'सुधारक दि. य. देशपांडे' या आदरांजलीपर लेखात 'दियं' यांचे यथार्थ व्यक्तिचित्रण केले आहे.[]

तत्त्वज्ञान मराठीत आणण्याचे कार्य

मराठी वाचकांना तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी देशपांडे यांनी ‘आजचा सुधारक’ मासिक सुरू करून आगरकरप्रणीत विवेकवाद जोपासण्याचा आणि तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्याचा प्रयत्‍न केला.

लेखन

दि.य. देशपांडे यांनी अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान ही ग्रंथमाला लिहिली.

शिक्षण

  • १९३७ : बी. ए. तत्त्वज्ञान - मॉरिस महाविद्यालय, नागपूर - सर्व महाविद्यालयांत प्रथम - रॉबर्टसन सुवर्णपदक
  • १९४० : एम. ए. तत्त्वज्ञान - मॉरिस महाविद्यालय, नागपूर - सर आॅर्थर ब्लेनर हॅसेट रौप्यपदक

शैक्षणिक कारकीर्द

  1. १९४१-४३ : मानद संशोधक - भारतीय तत्त्वज्ञान संस्था, अमळनेर
  2. १९४४-४५ : अधिव्याख्याता - विलिंग्टन महाविद्यालय, सांगली व रॉर्बटसन महाविद्यालय, जबलपूर
  3. १९४५-४७ : अधिव्याख्याता - मॉरिस महाविद्यालय, नागपूर
  4. १९४७-५० : अधिव्याख्याता - रॉबर्टसन महाविद्यालय, जबलपूर
  5. १९५०-६५ : अधिव्याख्याता - विदर्भ महाविद्यालय, अमरावती
  6. १९६५-.... : प्राध्यापक म्हणून पदोन्नती - विदर्भ महाविद्यालय, अमरावती
  7. १९६५-७५ : प्राध्यापक - विदर्भ महाविद्यालय, अमरावती
  8. १९७५-जुलै : सेवानिवृत्त

तत्त्वज्ञानात्मक कारकीर्द व पदे

  1. १९४९ : संस्थापक-अध्यक्ष व कार्यवाह - इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन, नागपूर
  2. १९७० : विभागीय अध्यक्ष - इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, पुणे
  3. १९७५ : विभागीय अध्यक्ष - इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, दिल्ली - सुवर्णमहोत्सवी अधिवेशन

ग्रंथसंपदा

मराठी

  1. सांकेतिक तर्कशास्त्र, श्रीप्रसाद प्रकाशन, नागपूर, १९७३
  2. युक्तिवादाची उपकरणे - मराठी साहित्य संघ, मुंबई, १९७६
  3. प्रज्ञावाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, प्रकाशक- दि.य. देशपांडे, मार्च १९९९.
  4. अनुभववाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, प्रकाशक- दि.य. देशपांडे, मार्च १९९९.
  5. कांट : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, प्रकाशक- दि.य. देशपांडे, मार्च १९९९.

इंग्लिश

  1. The Truth About God (1946)
  2. Ethics for Every Man (1946)
  3. Women, Family and Socialism (1947)

अनुवाद

  1. देकार्त : चिंतने (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९७४) - (रेने देकार्त या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्याच्या Meditations या ग्रंथाचे भाषांतर)

परामर्शचे विशेषांक

परामर्श (मराठी नियतकालिक)ाने प्रा. दि.य देशपांडे यांचे विचार सुस्पष्ट करण्यासाठी त्यांच्या हयातीत "प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन" या नावाचा विशेषांक दोन खंडांत प्रसिद्ध केला. पहिल्या खंडात दोन विभाग आहेत तर दुसऱ्या खंडात तिसरा विभाग आहे. त्याशिवाय दि.य. देशपांडे यांनी अनुवाद केलेल्या लेखांचा वेगळा एक अनुवादित अंकही प्रसिद्ध केला.

  1. "प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन"(१), खंड १५ : अंक १ मे १९९३ संपादक : सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि प्रदीप प्रभाकर गोखले,तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ
  2. "प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन"(२), खंड १५ : अंक २ ऑगस्ट १९९३ संपादक : सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि प्रदीप प्रभाकर गोखले , तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ
  3. "मूर, रसेल, फ्रेगे", खंड २७ : अंक ४ फेब्रुवारी-एप्रिल २००६ अनुवाद : प्रा. दि.य. देशपांडे

त्रिखंडी ग्रंथामालेविषयी अधिक माहिती

प्रा. दि.य. देशपांडे यांच्या मराठी लेखनापैकी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी जास्त अचूक माहिती देणारे तीन ग्रंथ - (१) प्रज्ञावाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, (२) अनुभववाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि (३) कांट : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान. या तीनही ग्रंथांची रचना चिंतनासाठी व अभ्यासासाठी सुयोग्य आहे.

विशिष्ट रचना

प्रत्येक खंडाची रचना दोन भागात एका विशिष्ट रीतीने केली आहे. पहिला भाग तत्त्ववेत्त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञान निर्मितीच्या पार्श्वभूमीचा व पूर्वसुरींच्या तत्त्वज्ञानाचा आणि शक्य होईल तिथे त्यांच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा परिचय दिला आहे. खंडाच्या दुसऱ्या भागात तत्त्ववेत्यांनी आपले तत्त्वज्ञान ज्या ग्रंथात, लघुग्रंथात मांडले त्यातील त्यांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणाऱ्या मुख्य निवडक वेच्यांचे, उताऱ्यांचे भाषांतर दिले आहे. हे भाषांतर दियंनी स्वतः केलेले आहे.

(१) प्रज्ञावाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान

  • पहिला भाग : रेने देकार्त (१५९६-१६५०), स्पिनोझा (१६३२-१६७७) व लाईब्नीत्स (१६४६-१७१६) या प्रज्ञावादी तत्त्ववेत्त्यांचा परिचय.
  • दुसरा भाग : मूळ साहित्य, उतारे, वेचे आणि दोन परिशिष्टे आहेत. एक –टिपा, दोन परिभाषा कोश

रेने देकार्त

मुख्य ग्रंथ : चिंतने

आद्य तत्त्वज्ञानावरील चिंतने

  1. चिंतन १ संदेहास्पद वस्तूंविषयी
  2. चिंतन २ मानवी मनाचे स्वरूप
  3. चिंतन ३ ईश्वराविषयी – तो आहे
  4. चिंतन ४ सत्य आणि असत्य
  5. चिंतन ५ भौतिक वस्तूंचे स्वरूप : ईश्वराच्या अस्तित्वाचा पुन्हा विचार
  6. चिंतन ६ भौतिक वस्तूंचे अस्तित्व : मन आणि शरीर यातील वास्तविक भेद

स्पिनोझा

मुख्य ग्रंथ: वेचे

  1. भाग पहिला : ईश्वराविषयी
  2. भाग दुसरा  : मनाचे स्वरूप आणि उत्पत्ती
  3. भाग तिसरा : भावनांचा स्वभाव आणि उत्पत्ति या विषयी
  4. भाग चौथा  : मानवी दास्याविषयी

लायब्नीत्स

  1. Monadology (एककशास्त्र) १७१४
  2. निसर्ग आणि ईश्वरी कृपा यांची प्रज्ञाधिष्ठित तत्त्वे १७१४
  3. अतिभौतिकीवर प्रवचन
  4. अर्नोशी पत्रव्यवहार (आंत्वान आर्नो (१६१२-९४), प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि गणिती. लायब्नीत्स याच्याकडे आपल्या Discourse on Metaphysics या पुस्तकाचा सारांश एर्न्स्ट फोन हेसेन ऱ्हाइन्फेल्स या उमरावाच्या द्वारा अभिप्रायार्थ पाठविला. त्यांतून त्या दोन तत्त्वज्ञांमध्ये दीर्घ पत्रव्यवहार झाला. त्याचा काही भाग.)[]

(२) अनुभववाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान

  • पहिला भाग : जॉन लॉक (१६३२-१७०४), जॉर्ज बार्क्ली (१६८५-१७५३) आणि डेव्हिड ह्यूम (१७११-१७७६) या अनुभववादी तत्त्ववेत्त्यांचा परिचय.
  • दुसरा भाग : मूळ ग्रंथ, उतारे, वेचे आणि दोन परिशिष्टे आहेत. एक –टिपा, दोन परिभाषा कोश.

जॉन लॉक

मुख्य ग्रंथ : मानवी बुद्धीविषयी प्रबंध

  1. पुस्तक १ : जन्मजात कल्पनांविषयी – प्रकरणे १ ते ३
  2. पुस्तक २ : कल्पनांविषयी - प्रकरणे १ ते ३,५ ते १३.
  3. पुस्तक ३ : शब्दांविषयी - प्रकरणे १ ते ३,६.
  4. पुस्तक ४ : ज्ञान व समजूत या विषयी - प्रकरणे १ ते ५, ७, ९, १०, ११, १४, २१, २५, २६, २७.

जॉर्ज बार्क्ली

मुख्य ग्रंथ : मानवी ज्ञानाचे सिद्धान्त

  • उपोद्घात : परिच्छेद १ ते २५
  • मानवी ज्ञानाचे सिद्धान्त : परिच्छेद १ ते ८२, ८५ ते ९१, ९७,९८, १०१,१०२, १३३, १३५ ते १४२, १४५ ते १५३.

डेव्हिड ह्यूम

मुख्य ग्रंथ : मानवी बुद्धीविषयी शोध

  1. परिच्छेद दुसरा: कल्पनांचा उगम[]
  2. परिच्छेद तिसरा- कल्पनांचे अनुबंध
  3. परिच्छेद चौथा : बुद्धीच्या व्यापारासंबंधी संशयवादी शंका
  4. परिच्छेद: या शंकाची संशयवादी सोडवण
  5. परिच्छेद सहावा : संभाव्यतेविषयी
  6. परिच्छेद सातवा : अवश्य अनुबंधाच्या कल्पनेविषयी
  7. परिच्छेद नववा : पशूंची बुद्धी
  8. परिच्छेद बारावा : संशयवादी तत्त्वज्ञानासंबंधी[]

(३)कांट: अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान

  • पहिला भाग : इम्मॅन्युएल कांट या तत्त्ववेत्याचा परिचय.
  • दुसरा भाग : मूळ ग्रंथ, उतारे, वेचे आणि दोन परिशिष्टे आहेत. एक –टिपा, दोन परिभाषा कोश

मुख्य ग्रंथ : शुद्ध प्रज्ञेची चिकित्सा

भाग १ : अ) कांटचा संक्षिप्त परिचय ब) कांटचे तत्त्वज्ञान

भाग २ : शुद्ध प्रज्ञेची चिकित्सा

एकमेव आवृत्त्या

  1. अनुभववाद - पहिली आवृत्ती मार्च १९९९
  2. कांट - पहिली आवृत्ती २०००.
  3. प्रज्ञावाद - पहिली आवृत्ती - साल दिलेले नाही.

सर्व पुस्तके बुकगंगा[] वर उपलब्ध आहेत.

संदर्भ व स्रोत

  1. ^ प्रा. दि.य. देशपांडे, मनोगत,http://aajachasudharak.in/manogat/ Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
  2. ^ प्रभा गणोरकर जगावेगळे, http://aajachasudharak.in/2015/03/244/ Archived 2017-01-03 at the Wayback Machine.
  3. ^ प्रा. दि.य. देशपांडे यांनी चौथ्या मुद्द्याच्या प्रारंभी ही शीर्षटीप दिली आहे. : प्रा. दि. य. देशपांडे, प्रज्ञावाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, पान १७३-७४)
  4. ^ येथे परिच्छेद १ गाळला आहे, अशी तळटीप दि. य. देशपांडे यांनी दिली आहे. अनुभववाद: अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान,पान १४१
  5. ^ प्रारंभी 'येथे परिच्छेद १ गाळला आहे, अशी तळटीप दि. य. देशपांडे यांनी दिली असली तरी नंतरचे परिच्छेद का वगळले त्याचा खुलासा त्यांनी दिलेला नाही : अनुभववाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान
  6. ^ http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5570386632511027455