Jump to content

दिव्य जीवन (ग्रंथ)

दिव्य जीवन हा ग्रंथ म्हणजे श्रीअरविंद लिखित 'लाईफ डिव्हाईन' या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद आहे. सेनापती पां.म.बापट यांनी हा अनुवाद केला आहे. श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगाचे तत्त्वज्ञान समजावून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.

हा ग्रंथ आधी ऑगस्ट १९१४ ते जानेवारी १९१९ या कालावधीमध्ये 'आर्य' या नियतकालिकामधून लेखमाला या स्वरूपात प्रकाशित करण्यात येत होता. त्याचे एकूण ५४ भाग प्रकाशित करण्यात आले होते. पुढे १९२१ आणि १९३९ साली या ग्रंथाचे पुनरावलोकन करून नव्याने संपादन करण्यात आले. []

दिव्य जीवन
लेखकश्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)The Life Divine
अनुवादकसेनापती पां.म.बापट
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारवैचारिक ग्रंथ
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती१९६०
विषयश्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान
आय.एस.बी.एन.81-7058-618-6

ग्रंथाची मांडणी

ग्रंथाची मांडणी तीन पुस्तकांमध्ये करण्यात आली आहे.

क्र. खंड भाग खंडाचे शीर्षक समविष्ट प्रकरणांची संख्या पृष्ठसंख्या
०१ पहिला एक सर्वगत ब्रह्म आणि ब्रह्मांड २८ ५४१
- दुसरा - ज्ञान आणि अज्ञान - आध्यात्मिक विकास - -
०२ दुसरा एक अनंत जाणीव आणि अज्ञान १४ ५९९
०३ दुसरा दोन ज्ञान आणि आध्यात्मिक विकास १४ ७३८

बाह्य दुवा

दिव्य जीवन - खंड पहिला

पूरक वाचन

कॉमेन्टरीज ऑन द लाईफ डिव्हाईन (इंग्रजी):

दिव्य जीवन या ग्रंथाच्या खंड ०२ - भाग ०२ मधील तीन प्रकरणांवर श्रीमाताजी यांनी भाष्य केले आहे. ते पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले आहे. १९५७ ते १९५८ या कालावधीत श्रीमाताजी आधी 'दिव्य जीवन'मधील एक उतारा वाचून दाखवत असत आणि मग त्यावरील शंकांचे निरसन करत असत. मानव आणि विकास, आध्यात्मिक मानवाचा विकास आणि रुपांतराची त्रिपदी या तीन प्रकरणांवर आधारित हे भाष्य आहे.[]

संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (2005). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 21. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  2. ^ The Mother (1994). Commentaries on The Life Divine. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-378-0.