Jump to content

दिवस आलापल्लीचे


आलापल्ली हे गडचिरोली जिल्ह्यातील एक सुंदर फॉरेस्ट व्हिलेज. तिथे बँकेतील नोकरीच्या निमित्ताने एक कुटुंब शहरी भागातून रहायला येते. त्या कुटुंबातील एका लहान मुलीच्या आठ ते अकरा वर्षे वयातील बालपणीच्या आठवणी म्हणजे दिवस आलापल्लीचे[] हे पुस्तक.

फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटचे हत्ती, त्यांच्या शाळेकडेच्या ओढ्यातल्या आंघोळी, शाळेतली आदिवासी मुले, आदिवासींच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांची गरिबी, जादूटोणा, जवळच असलेली बाबा आमटेंची लोकबिरादरी, लेखिकेच्या कुटुंबाला लाभलेला बाबा आमटेंचा सहवास.. ही सगळी वर्णने पुस्तकाला वेगळी उंची प्रदान करतात.

दिवस आलापल्लीचे
चित्र:Divas.alapalliche.nilima.photo1.jpg
लेखकनीलिमा क्षत्रिय
भाषामराठी
साहित्य प्रकारललित
प्रकाशन संस्थाअल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक
चालू आवृत्तीपाचवी
मुखपृष्ठकारसतीश भावसार
पृष्ठसंख्या१८६
आय.एस.बी.एन.९७८८१९३८६१३६३

पुरस्कार -

1) महाराष्ट्र राज्य शासनाचा ललितगद्य, प्रथम प्रकाशनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार, मुंबई.[] [][]

2) अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर.[]

3) मराठा मंदिर पुरस्कार, मुंबई.

4) पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, लोणी.[]

5) गिरिजा कीर  पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे  

6) दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार

संदर्भ-
  1. ^ क्षत्रिय, नीलिमा (२०१८). दिवस आलापल्लीचे. नाशिक: अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक. ISBN 9788193861363.
  2. ^ सकाळवृत्तसेवा (2020-02-06). "राज्य वाङ्‌मय पुरस्कार कोणाकोणाला मिळाले पहा". Marathi News Esakal. 2024-07-16 रोजी पाहिले.
  3. ^ "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार". महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 2018-12-15. 2024-07-16 रोजी पाहिले.
  4. ^ दिव्य मराठी. "न्या. चपळगावकर, भापकर, दळवी यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार". १५ जुलै 2024 रोजी पाहिले.
  5. ^ महाराष्ट्र टाईम्स. "कवी अनंत फंदी पुरस्कार जाहीर". १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "Zunjhar News - विखे पाटील साहित्य पुरस्काराची ३३ वर्षं, श्रमाचा आणि मातीचा गंध लाभलेल्या साहित्याचा गौरव : ना राधाकृष्ण विखे पाटील" (इंग्रजी भाषेत). 2023-08-30. 2024-07-16 रोजी पाहिले.