दिल से..
दिल से | |
---|---|
दिग्दर्शन | मणी रत्नम |
निर्मिती | भरत शहा, मणी रत्नम, राम गोपाल वर्मा |
कथा | तिग्मांशू धुलिया |
प्रमुख कलाकार | शाहरुख खान मनीषा कोईराला प्रीती झिंटा |
संगीत | ए.आर. रहमान |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २१ ऑगस्ट १९९८ |
वितरक | इरॉस इंटरनॅशनल |
अवधी | १५८ मिनिटे |
निर्मिती खर्च | १२ कोटी |
एकूण उत्पन्न | १७.५ कोटी |
दिल से हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. मणी रत्नमने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान व मनीषा कोईरला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. रोजा व बॉम्बे नंतर दहशतवादावर आधारित असलेला हा मणी रत्नमचा सलग तिसरा चित्रपट होता. तिकिट खिडकीवर अपयशी ठरून देखील दिल सेला ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
पुरस्कार
- फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार - प्रीती झिंटा
- फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार - ए.आर. रहमान
- फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार - सुखविंदर सिंग
- फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - गुलजार
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील दिल से.. चे पान (इंग्लिश मजकूर)