दिलीप सरवटे
डाॅ. दिलीप सरवटे हे व्यवस्थापन या विषयावर मराठी-इंग्लिशमध्ये लिहिणारे लेखक आहेत. ते स्वतः उद्योजक, व्यवस्थापन सल्लागार व व्यवस्थापन शिक्षक आहेत. हे पुण्यातून ३२हून अधिक वर्षे स्थायिक आहेत. ते सर्टिफाईड मॅनेजमेन्ट कन्सल्टंन्ट (CMC) असून सन १९९८-२००० या काळात 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट कन्सल्टंट ऑफ इंडिया' (आयएमसीआय)चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी ७००हून अधिक प्रकल्पांवर काम केले आहे. ते मॅनेजमेन्ट स्ट्रॅटेजी, उद्योजकता विकास व तत्सम विषयांवर व्याख्याबे देणारे एक प्रसिद्ध वक्ते आहेत.
सरवटे हे मुंबई विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी अमेरिकेतून मॅनेजमेन्ट ॲन्ड बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए)ची पदवी मिळवली व त्यानंतर पुणे विद्यापीठाची डाॅक्टरेट. ते स्वतः पीएच.डी.चे गाईड असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२हून अधिक विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे.
सरवटे यांची १०हून अधिक इंग्रजी पुस्तके व ७हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पुस्तके
- Advertising, Sales And Distribution Management (काॅमर्स काॅलेजकरिता क्रमिक पुस्तक, इंग्रजी)
- आजारी उद्योग : समस्या व उपाय
- Indian Cases In Marketing Management (इंग्रजी)
- उत्कृष्टतेच्या शोधात : काही भारतीय अनुभव
- उद्योजक बना
- Entrepreneurial Development (काॅमर्स काॅलेजकरिता क्रमिक पुस्तक, इंग्रजी)
- Entrepreneurship Development And Project Management (काॅमर्स काॅलेजचे क्रमिक पुस्तक, इंग्रजी)
- ग्राहक राजा जागा हो
- निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही (सहलेखक - डाॅ. उदय निरगुडकर)
- Management Innovation (इंग्रजी)
- Marketing Research.(इंग्रजी)
- सहयोजक बना
- ज्ञानयोजक बना