दिलीप पु. चित्रे
दिलीप वि. चित्रे याच्याशी गल्लत करू नका.
दिलीप पु. चित्रे | |
---|---|
जन्म नाव | दिलीप पुरुषोत्तम चित्रे |
जन्म | १७ सप्टेंबर १९३८ बडोदा, गुजरात, भारत |
मृत्यू | १० डिसेंबर २००९ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, चित्रकला |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कविता, समीक्षा |
विषय | कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | पुन्हा तुकाराम |
वडील | पुरुषोत्तम आत्माराम चित्रे |
आई | विमल पुरुषोत्तम चित्रे |
दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे प्रकाशित साहित्य, प्रकाशक आणि प्रकाशनाचे वर्ष
- ऑर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
- एकूण कविता-१, (दिलीप चित्रे यांची समग्र कविता, संपादक - रणधीर शिंदे), पॉप्युलर, मुंबई, १९९२; दुसरी आवृत्ती: १९९५
- एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई; १९९५
- एकूण कविता-३, पॉप्युलर, १९९७
- एकूण कविता-४, पॉप्युलर, २०१६ (संपादक - चंद्रकांत पाटील)
- कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०
- कवितेनंतरच्या कविता, वाचा प्रकाशन, औरंगाबाद, १९७८ (संपादित, संपादक - चंद्रकांत पाटील, भालचंद्र नेमाडे)
- चतुरंग, पॉप्युलर, १९९५
- चाव्या; प्रास प्रकाशन, १९८३
- तिरकस आणि चौकस, लोकवाङ्मयगृह, मुंबई, १९८०
- पुन्हा तुकाराम, १९९०; दुसरी आवृत्ती: १९९५; तिसरी आवृत्ती: २००१
- दहा बाय दहा, प्रास प्रकाशन, मुंबई, १९८३ (संपादक - अशोक शहाणे)
- भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा; लोकवाङ्मयगृह, मुंबई, १९९५
- शिबा राणीच्या शोधात; मॅजेस्टिक, मुंबई, १९६९
इंग्रजी
- An Anthology of Marathi Poetry (1945-1965) (Editor), Nirmala-Sadanand, Mumbai, 1968
- Ambulance Ride, Self, Mumbai, 1972
- Shri Jnandev’s Anubhavamrut : The Immortal Experience of Being, Sahitya Akademi, New Delhi, 1996
- No-Moon Monday On The River Karha, Vijaya Chitre, Pune, 2000
- The Mountain, Vijaya Chitre, Pune, 1998
- Says Tuka (तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद)
- The Reasoning Vision: Jehangir Sabavala’s Painterly Universe, Introduction and Notes on the paintings by Dilip Chitre
- Tata-McGraw-Hill, New Delhi, 1980
- Tender Ironies: A Tribute To Lothar Lutze (Editor), Manohar, New Delhi, 1994
- Travelling In A Cage; Clearing House; Mumbai; 1980
संपादित केलेली नियतकालिके
- शब्द (त्रैमासिक) (१९५४-१९६०)
- New Quest (1978-1980), (2001-2009), Mumbai
स्तंभलेखन केलेली नियतकालिके
- अभिरुची
- New Quest
- Free Press Journal, Mumbai(1959-1960)
- मुंबई दिनांक
- रविवार सकाळ
- लोकसत्ता
पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार १९९४: एकूण कविता -१ काव्यसंग्रहासाठी
- साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (इंग्रजी भाषेसाठी) १९९४ : 'Says Tuka'काव्यसंग्रहासाठी
इतर
- गोदान चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन
- विजेता चित्रपटाची कथा, पटकथा
बाह्य दुवे
- कविता स्वतःतच मोठी किंवा लहान होते...[permanent dead link]
- दिलीप चित्र्यांचे अधिकृत संस्थळ