दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधील गुवाहाटी व दिब्रुगढ ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढ रेल्वे स्थानक ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. सध्या दिब्रुगढ राजधानीचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत.
मार्ग
- 12423/12424 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान रोज धावते.
- 12235/12236 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान मुझफ्फरपूरमार्गे आठवड्यातून एकदा धावते.
- 12435/12436 दिब्रुगढ ते नवी दिल्ली दरम्यान हाजीपूरमार्गे आठवड्यातून दोनदा धावते.
स्थानके
- दिब्रुगढ
- तिनसुकिया
- मरियानी
- दिमापूर रेल्वे स्थानक
- दिफु
- लुमडिंग रेल्वे स्थानक
- गुवाहाटी रेल्वे स्थानक
- बॉंगाइगांव
- कोक्राझार
- न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक
- न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक
- किशनगंज
- कटिहार
- नौगछिया
- बरौनी
- पाटणा रेल्वे स्थानक
- मुघलसराई
- अलाहाबाद रेल्वे स्थानक
- कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक
- नवी दिल्ली रेल्वे स्थानक