दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस
दिबृगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. विवेक एक्सप्रेस नावाच्या ४ गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या दिब्रुगढ ते तमिळनाडू ह्या राज्याच्या दक्षिण टोकाला स्थित असलेल्या कन्याकुमारी ह्या शहरांदरम्यान धावते. हिचा एकूण प्रवास 4283 किमीआहे जो ती 84 तास आणि 45 मिनिटात पूर्ण करते. उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवली जात असणारी ही गाडी भारताच्या पूर्वेकडील सहा राज्यातून धावते.[१]४२८३ किमी धावणारी दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस भारतीय उपखंडातील सर्वात लांबचा प्रवास करणारी तर जगातील ९व्या क्रमांकाची लांब रेल्वेगाडी आहे.[२]
ट्रेन वेळ
ट्रेन क्रं. | निर्गमन ठिकाण | वेळ | आगमन ठिकाण | वेळ | दिवस |
---|---|---|---|---|---|
15905 | कन्याकुमारी[३] | 23:00 | दिब्रुगढ | 7-15 (5 वा दिवस) | गुरुवार |
15906 | दिब्रुगड | 23:45 | कन्याकुमारी | 9.50 (5 वा दिवस) | शनिवार |
मार्ग
दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस भारताच्या आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ ह्या सात राज्यांतून धावते.
प्रमुख स्थानके
- दिब्रुगढ
- तिनसुकिया
- दिमापूर
- गुवाहाटी
- न्यू जलपाईगुडी
- माल्दा टाउन
- दुर्गापूर
- आसनसोल
- मिदनापूर
- भुवनेश्वर
- विशाखापट्टणम
- विजयवाडा
- सेलम
- इरोड
- कोइंबतूर
- पालक्काड
- एर्नाकुलम
- तिरुवनंतपुरम
- कन्याकुमारी
रचना
या गाडीला 2 द्वितीय श्रेणी, 3 तृतीय श्रेणी वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डबे जोडले जातात.
संदर्भ
- ^ "आता दक्षिण आणि ईश्यान भाग ट्रेन मुळे जवळ येतील" (इंग्लिश भाषेत). ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "डी बी आर जी विवेक एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2015-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "चेन्नई एग्मोरे आणि कन्याकुमारी दरम्यान स्थानके" (इंग्लिश भाषेत). ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)