Jump to content

दिनकर द. पाटील

जन्मनोव्हेंबर ६, १९१५
मृत्यूऑक्टोबर २३, २००५
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र चित्रपटः दिग्दर्शन, पटकथालेखन, कथालेखन
भाषामराठी

दिनकर द. पाटील (नोव्हेंबर ६, १९१५ - ऑक्टोबर २३, २००५) हे मराठी चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक, पटकथाकार होते.

जीवन

दिनकर द. पाटलांचा जन्म नोव्हेंबर ६, १९१५ रोजी बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील बेनाडी गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेनाडीतच झाले. शालेय शिक्षणानंतर इ.स. १९४० च्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात वृत्तपत्रांमधून लेखन आरंभले. १९४१ साली त्यांनी मास्टर विनायकांच्या 'हंस पिक्चर्स' चित्रपटकंपनीत नोकरीस लागले. इ.स. १९४७ सालापर्यंत ते 'हंस पिक्चर्स'मध्ये कामास होते. वामनराव कुलकर्णी व विष्णूपंत चव्हाण यांच्या 'मंगल पिक्चर्स'च्या 'जय मल्हार' चित्रपटाकरता संवाद लिहिण्यानिमित्ताने त्यांचे नाव चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा ठळकपणे प्रसिद्धीस आले. पाच दशके चित्रपटकारकीर्द अनुभवलेल्या पाटलांनी शंभराहून अधिक चित्रपटांकरता संवाद लिहिले तर पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपट वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
जय मल्हारमराठीसंवाद
सांगत्ये ऐकामराठी
बेल-भंडारामराठी
शिकलेली बायकोमराठी
बाळ माझं नवसाचंमराठी
सुधारलेल्या बायकामराठी
पाटलाची सूनमराठी
फटाकडीमराठी
कुंकवाचं लेणंमराठी
गुणवंताची कन्यामराठी
मोसंबी नारंगीमराठी
मंदिर१९४८हिंदीदिग्दर्शन
रामराम पावणं१९५०मराठीदिग्दर्शन
शारदा१९५१मराठीदिग्दर्शन
पाटलाचं पोर१९५१मराठीदिग्दर्शन
मायबहिणी१९५२मराठीदिग्दर्शन
घरबार१९५३हिंदीदिग्दर्शन
तर्क१९५४मराठीदिग्दर्शन
मूठभर चणे१९५५मराठीदिग्दर्शन
कुलदैवत१९५५मराठीदिग्दर्शन
दिसतं तसं नसतं१९५६मराठीदिग्दर्शन
नवरा म्हणू नये आपला१९५७मराठीदिग्दर्शन
देव जागा आहे१९५७मराठीदिग्दर्शन
उमज पडेल तर१९६०मराठीदिग्दर्शन
भैरवी१९६०मराठीदिग्दर्शन
माझी आई१९६१मराठीदिग्दर्शन
वरदक्षिणा१९६२मराठीदिग्दर्शन
प्रेम आंधळं असतं१९६२मराठीदिग्दर्शन
बाप माझा ब्रह्मचारी१९६२मराठीदिग्दर्शन
ते माझे घर१९६३मराठीदिग्दर्शन
मल्हारी मार्तंड१९६५मराठीदिग्दर्शन
कामापुरता मामा१९६५मराठीदिग्दर्शन
सुरंगा म्हन्त्यात मला१९६७मराठीदिग्दर्शन
धन्य ते संताजी धनाजी१९६८मराठीदिग्दर्शन
काळी बायको१९७०मराठीदिग्दर्शन
कोर्टाची पायरी१९७०मराठीदिग्दर्शन
मीही माणूसच आहे१९७१मराठीदिग्दर्शन
अधिकार१९७१मराठीदिग्दर्शन
कुंकू माझं भाग्याचं१९७२मराठीदिग्दर्शन
जोतिबाचा नवस१९७५मराठीसंवाद, पटकथा
पैजेचा विडा१९७९मराठीसंवाद
सूनबाई, ओटी भरून जा१९७९मराठीदिग्दर्शन
सुळावरची पोळी१९८०मराठीदिग्दर्शन
सवत१९८०मराठीदिग्दर्शन
मंत्र्याची सून१९८०मराठीदिग्दर्शन
कुंकवाचा टिळा१९८१मराठीदिग्दर्शन
सुलक्षणा१९८२मराठीदिग्दर्शन
भामटा१९८२मराठीदिग्दर्शन
भटकभवानी१९८७मराठीदिग्दर्शन
शिवरायाची सून ताराराणी१९९३मराठीदिग्दर्शन