Jump to content

दिघी

दिघी हे पुण्याचे उपनगर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक गाव आहे. तेथे सन १९५९मध्ये ग्रामपंचायत झाली, आणि १९५९मध्ये शाळा झाली. १९९६मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाले.

दिघी आळंदी-पुणे रस्त्यावरील ज्ञानेश्वरांच्या पालखी मार्गावरील गाव आहे. गावाच्या चारही बाजूंना लष्कराच्या विविध आस्थापना आहेत. दिघी गावाशेजारच्या दत्तगड किल्ला टेकडीवर दत्ताचे देऊळ आहे. तसा दत्तगड फारसा उंच नाही,गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.गडावर खूप भाविक श्री.गुरुदेव दत्तमहाराजांच्या दर्शनासाठी ही येत असतात.सद्ध्याची पीढी(Dighi Hills) नावाने ओळखते. याशिवाय गावात गावाचे ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर, तसेच व्बिठ्ठल-रुक्मिणी, गणपती, शंकर मारुती, शनी, खंडोबा, साईबाबा, काळुउबाई, यमाई, दिव्याई, मरीआई आदी देवदेवतांची मंदिरे आहेत.

पालखी रस्त्यामुळे गावाचे पूर्व दिघी आणि पश्चिम दिघी असे दोन भाग झाले आहेत.