Jump to content

दिगंबर कामत

दिगंबर कामत (मार्च ८, १९५४ - हयात) गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. १९९४पर्यंत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले. २००५मध्ये सरकारात असलेल्या भाजपातून ते काँग्रेसमध्ये परतले. विधानसभेत त्यांनी मडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

२००७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडे सरकार स्थापण्याइतपत संख्याबळ होते तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रवी नाईक आणि तत्कालीन विद्यमान मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे या दोघांतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या पक्षांतर्गत चुरशीमुळे कामतांचे नाव राजकीय तडजोड म्हणून पुढे आले. जुलै २५, २००७ रोजी कामत सरकार सरकारातील आघाडी फुटल्याने व सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे अडचणीत सापडले.

संदर्भ आणि नोंदी

मागील:
प्रतापसिंह राणे
गोव्याचे मुख्यमंत्री
जून २००७२०१२
पुढील:
मनोहर पर्रीकर