Jump to content

दिगंबर

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर. (दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असा जो तो) दिगंबर पंथाचे मुनी वस्त्र धारण करीत नाहीत, ते कडक व्रतांचे पालन करतात. काम, क्रोध, लोभ,मोह, मद, मत्सर या षड्रिपूंपासून पूर्णपणे दूर राहण्याचा प्रयत्न करतात. या सहाही भावनांवर त्यांचे नियंत्रण असते. ते भिक्षापात्रही वापरत नसून ते संपूर्ण शाकाहारी असतात.