Jump to content

दामोदर सावळाराम यंदे


दामोदर सावळराम यंदे हे मुंबईतील एक पुस्तक प्रकाशक होते. दामोदर सावळाराम आणि मंडळी ही त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने अनेक धार्मिक, सामाजिक आणि वेदवाङ्मयावर आधारित पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशित पुस्तकांची एक छोटीशी यादी पाहिली की त्यांनी केलेल्या प्रचंड कामाचा प्रत्यय यावा. यंदे हे स्वतः लेखकही होते.

दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी प्रकाशित केलेली पुस्तके

  • अनंतमहाराज चितारीबुवा अल्प चरित्र व समग्र ग्रंथ (ग्यानगीरबुवा नेऊरगाव,बळवंतराव मास्तर नाते, जी.कृष्णराय-निवृत्त पोस्ट मास्टर, पैठण).; १९२७).
  • अपरोक्षानुभूति : संस्कृत-मराठी (विष्णू वामन बापट,१९२८).
  • अबलोेन्नती लेखमाला (समग्र) - चिंतामण विनायक वैद्य).
  • अभंग व पदें (उदासी हरिहर महाराज)
  • अमीर अबदुल रहिमान (वि.को. ओक)
  • अर्वाचीन कविता (पूर्वार्ध-चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे)
  • अर्वाचीन कविता अर्थात आधुनिक महाराष्ट्र कवींच्या काव्यातील वेचे - चंद्रशेखर शिवराम गोरे; जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (पूर्वार्ध, ज.र. आजगावकर, १९२८)
  • कथासरित्सागर (हिंदी, विष्णू वामनशास्त्री बापट, १९५७)
  • कुकर्मपरिपाक - १ली आवृत्ती.
  • तत्त्वानुसंधानसार (मराठी, विष्णू वामन बापट, १९०९)
  • तुकारामाच्या अभंगरत्नांचे हार (शांताराम अनंत देशाई, १९१०)
  • दत्तप्रबोध मराठी ओवीबद्ध; ६१ अध्याय (अनंतसुत विठ्ठल कावडीबुवा). (दुसरी आवृत्ती, १९६३)
  • दत्तप्रबोध अंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबाबा यांच्या श्री दत्तप्रबोध या ग्रंथावर आधारित (शरद उपाध्ये, १९९७)
  • नरसिंह मेहेता (दा.ना. आपटे). १९३३.
  • पंचदशी (अनेक भाग, (विष्णू वामनशास्त्री बापट, १९०४).
  • ब्रह्मचर्य हेंच जीवन वीर्यनाश हाच मृत्यु - शिवानंद (वडूजकर). १९२५.
  • भगवद्गीता सान्वय, सार्थ, सटीक, संस्कृत-मराठी, वामनी सश्लोक, मोरापंती आर्या, तुकाराम अभंग, मुक्तेश्वरी ओवी, उद्धवचिद्घन, सवाईसहित (संपादक - कृष्णराव अर्जुन केळूसकर) . १९२७.
  • श्रीमद्भागवत : भाग २, स्कंध २-३; भाग ३, स्कंध ४; भाग ५, स्कंध ७-८; भाग ६, स्कंध ९; भाग ७, स्कंध १० (पूर्वार्ध); भाग ८, स्कंध १0 (उत्तरार्ध), स्कंध १२, भाग १० (१९२९)
  • भक्त लीलामृत-ओवीबद्ध -मराठी (महिपती ताहराबादकर) १९३५.
  • भागवत कळसरूपी शेवटचा भाग ६वा + सुलभ सुभाषित संग्रह + भागवतस्वारस्य सूचि पौराणिक कोश (जोगळेकरशास्त्री, के.ल. ओगले, चिं.ग. भानू, गोडसे, साधले, निगळे, घघवे, भावे,बडोदेकर). १९६५.
  • भारतीय ज्योतिर्गणित ४ प्रकरणे, ६ परिशिष्टे + वर्णसूचि. (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) १९१३ .
  • भारतीय समाजस्थिती (वि.पां दांडेकर)
  • सार्थ-सटीप-महाभारत-उद्योग पर्व,अध्याय १ ते ७ (चिंतामण विनायक वैद्य, १९३४)
  • सार्थ-सटीप महाभारत-भीष्म पर्व: पूर्वार्ध : अध्याय १ ते ५८) - नरहर गणेश जोशी)
  • भूभविष्य (वामन नानाजी रेखी, अहमदनगर, १९०१)
  • महाराष्ट्र कवि चरित्र भाग १, २. (ज.र. अजगावकर); १९१३.
  • मुण्डकोपनिषत् शांकरभाष्य मराठी भाषांतरासहित : माध्व रंगरामानुज यांच्या संस्कृत परीक्षणासहित (चिंतामण गंगाधर भानु). १९१३
  • मुंबई इलाख्याचे प्रसिद्ध गव्हरनर मौंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन साहेब यांचे चरित्र (पूर्वार्ध) - कृष्णाजी बल्लाळ गोडबोले). १९११.
  • बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर (के.मं. रांगणेकर)
  • बृहद् योगवासिष्ठसार-भाग १, २, ३. (विष्णू वामन बापट). १९०९, १९०९, १९१२.
  • लौकिक दंतकथा (१९३४)
  • वनस्पतीविचार (रघुनाथ विष्णू दामले, १९१३)
  • विश्वनिरीक्षण (?)
  • शास्त्रीय मराठी व्याकरण : उद्‌घाटन व ऊहापोह (मोरो केशव दामले, १९११)
  • श्रीकृष्णमाहात्म्य (दा.सा. यंदे). १९२६.
  • श्रीमन्महाराज सयाजीराव यांची भाषणे (तीन खंड; १९३६,३७, ३९)
  • सूर्येदु - स्थानमान (शिवराम गणपत पवार)
  • स्वामी चिदानंद अथवा प्रस्तुत चळवळीचे प्रतिबंध (रामचंद्र नरगुंदकर); १९०७.


दामोदर सावळाराम यंदे यांच्यावरील पुस्तके

  • स्व.दामोदर सावळाराम यंदे यांचे प्रकाशन कार्य (सदानंद यंदे)

.