Jump to content

दामोदर गंगाराम धोत्रे

दामोदर धोत्रे ऊर्फ दामू धोत्रे (ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ - १९७२) हे मराठी सर्कसपटू, रिंगमास्टर होते. सर्कस मालक तुकाराम गणपत शेलार हे धोत्र्यांचे मामा होते.

जीवन

ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ रोजी धोत्र्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे शहरात कसबा पेठेत झाला. त्यांनी रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नम अँड बेली सर्कस या जगप्रसिद्ध सर्कशीत त्यांनी वाघ सिंहांसह कसरती केल्या होत्या. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनीही त्यांची प्रशंसा केली होती.[] अमेरिकेतील 'सर्कस वर्ल्ड म्युझियम'मध्ये धोत्रे यांचे पुतळे व सर्कशीत वापरलेले साहित्य जतन करून ठेवण्यात आलेले आहे. 'वाघ सिंह माझे सखे-सोबती' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले असून त्यातील एका प्रसंगाचा महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता.

संदर्भ

  1. ^ [१][permanent dead link]
  • वाघ सिंह माझे सखे-सोबती, लेखक: दामू धोत्रे

बाह्य दुवे