दामाजी महाविद्यालय
विद्या विकास मंडळ संचलित संत दामाजी महाविद्यालयाची स्थापना सन १७ जुलै 1९७८ आहे.
महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य असाध्य ते साध्य करिता सायास आहे.
मंगळवेढा येते,मा.रतनचंदजी शिवलाल शह यांनी विद्या विकास मंडळाची स्थापना उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केली आहे. सन 1९७८ पासून महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न हेते.परुंतु सन २००४ मध्ये सोलापूर विद्यापीठ निर्मीतीपासून महाविद्यालय सोलापूर विद्यापीठाशी संलग्न झाले आहे.महाविद्यालय सध्या अर्थशास्त्र, भूगोल,इतिहास,मराठी,हिंदी आणि इंग्लिश विषयांचे विभाग कार्यरत आहेत.१४ जानेवारी २००४ मध्ये महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २ एफ आणि १२ बी प्राप्त झाले आहे.महाविद्यालय ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. महाविद्यालयाचे क्षेत्रफळ २८७७२.६१ चौरस मी आहे.
प्राचार्य
डॉ.प्रो.एन.बी.पवार हे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सन २०१६-२०१७ पासून कार्यरत आहेत.[१]
पुरस्कार
मंगळवेढा तालुक्यात महाविद्यालयाने केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने दलित मित्र हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
संदर्भ
- ^ C:\Users\santosh\Desktop\rar2015.pdf