दाभोसा धबधबा
धबधब्याचे नाव | दाभोसा |
धबधब्याची उंची | ३०० फूट |
स्थळ | जव्हार, पालघर जिल्हा, महाराष्ट्र |
नदीचे नाव |
दाभोसा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील,जव्हार तालुक्यातील एक बारमाही धबधबा आहे. सुमारे ३०० फूट उंचीचा हा धबधबा जव्हारपासून २० किमी अतरांवर आहे.[१]आणि मुंबई पासून १५० किमी अंतरावर आहे.
हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कडय़ावरून कोसळणारी दाभोसाची पांढरीशुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. पायवाटेने तोल सांभाळत, जरा घसरत, दरीत उतरल्यानंतर काना-मनात भरून राहतो तो धबधब्याच्या धारेचा धीरगंभीर नाद, ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा तो नाद नंतरही कानात गुंजत राहतो.
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/others/tourism/articleshow/21023526.cms[permanent dead link]