दहिवद
दहिवद हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - धुळे या राज्य महामार्गापासून २ किलोमीटर आत आहे.
लोकजीवन
गावात प्रामुख्याने 99% हिंदू धर्मीय आहेत.
प्रशासन
गावाचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव मेहुणबारे पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते.
शिक्षण
गावात शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते.
आरोग्य
गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
व्यवसाय
येथील जनजीवन हे शेतीवर अवलंबून आहे. काही लोक दुधाचा व्यवसाय करतात
धार्मिक वातावरण
गावातले लोक श्रद्धाळू आहेत. गावात हनुमान मंदिर, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, दत्ताचे देऊळ आणि एक जुने विष्णूचे मंदिर आहे. तसेच रामदेवबाबा व सुधाकरबाबा यांचीही मंदिरे आहेत; एका पीराचा दरगा आहे एक वीरगळही आहे.