Jump to content

दयानिधी संत भगवानबाबा (चित्रपट)

विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या चरित्रावर आधारलेल्या 'दयानिधी संत भगवानबाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम यांनी केली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवादलेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती. या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रविंद्र महाजनी आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्ठीतील जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार, रवी पटवर्धन, सुहाशिनी देशपांडे, अतुल अभ्यंकर, मुक्ता पटवर्धन , श्रेयश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVDचे प्रकाशन करण्यात आले. आता ही DVD सर्वत्र उपलब्ध आहे .