दयानंद वाणिज्य महाविद्यालय (लातूर)
दयानंद वाणिज्य महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या लातूर शहरातील महाविद्यालय आहे. येथे व्यवस्थापन आणि वाणिज्याशी निगडीत विषयांचे ११वी इयत्ता ते विद्यावाचस्पती पदवीपर्यंत अध्यापन होते. हे अध्यापन इंग्लिश आणि मराठी माध्यमातून होते. याची स्थापना १९७० साली झाली. हे मराठवाड्यातील वाणिज्य शाखेचे एकमेव स्वतंत्र महाविद्यालय आहे.