Jump to content

दमा

फुफुसंच्या वाढलेल्या संवेदनशीलतेस दमा असे म्हणतात. दम्याच्या त्रासात सतत खोखला येणे व धाप येणे ही मुख्य लक्षणे आहेत.

दमा
----
श्वसन दर मोजण्याचे यंत्र
ICD-10 J45
ICD-9493
OMIM600807
DiseasesDB1006
MedlinePlus000141
eMedicinearticle/806890
MeSHD001249


अस्थमा आधी व नंतर

वर्णन

श्वासोश्वासास होणारा त्रास म्हणजे दमा. ही व्याधी आनुवंशिक आहे असे समजतात.

कारणे

दमा बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी.

आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थांची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्नपदार्थाने दम्याचा त्रास होतो हे ओळखता येईल. मुलांना होणाऱ्या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे.

तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.

इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो.

वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.

==आहार==आणखी घरगुती उपाय

1) दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ सुटतो. 2) खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अ‍ॅटॅक कमी होतो. 3) मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो. 4) रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो. 5) हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. 6) आद्रक आणि मध घ्यावा तसेच पपई खावी. याशिवाय इतर चिकित्सा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

पथ्य

दमा हा आजार दीर्घकाळ त्रास असल्यामुळे त्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र दमा असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ व दैनंदिन औषधे घेतल्याने दम्याच्या त्रासातून काही प्रमाणात मोकळीक मिळू शकते. दम्याची लक्षणे दिसल्यावर अल्पकालीन औषधांच्या उपाययोजनातूनही त्वरीत आराम पडू शकतो.

दम्याचे नियंत्रण फक्त औषधोपचारांनी करता येत नाही. ह्या व्यक्तींनी दम्याच्या त्रासाला सुरुवात करून देणाऱ्या तसेच श्वसनमार्गावर परिणाम करणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या रोगांमुळे बळी पडणाऱ्यांसारखे दम्याने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण नसले तरीही औषधोपचार न करणे तसेच दम्याचे गांभीर्य न समजणे यामुळे दम्याने मृत्यू ओढवू शकतो. बऱ्याचवेळा तो रूग्णालयाच्या बाहेरच होतो.

   शक्यतो या व्यक्तीनी कोणत्याही प्रकारच्या निकोटीन पासून दुर रहावे उदा.तंबाखू गुटखा यांनी दम्याचा प्रभाव वाढतो.

संदर्भ