Jump to content

दबंग

दबंग
दिग्दर्शन अभिनव कश्यप
निर्मिती अरबाज खान
मलाइका अरोरा खान
प्रमुख कलाकारसलमान खान
सोनाक्षी सिन्हा
अरबाज खान
माही गिल
सोनू सूद
विनोद खन्ना
डिंपल कापडिया
अनुपम खेर
संगीतसाजिद-वाजिद, ललित पंडित
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १० सप्टेंबर २०१०
अवधी १७२ मिनिटे
निर्मिती खर्चभारतीय रूपया ३० कोटी
एकूण उत्पन्नभारतीय रूपया २२५ कोटी



दबंग हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशमधील चुलबुल पांडे नावाच्या एका काल्पनिक पोलीस अधिकाऱ्यावर आधारित आहे. दबंगचे चित्रीकरण महाराष्ट्रातील वाई व संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले.

१० सप्टेंबर २०१० रोजी ईद-उल-फित्रच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दबंगने पहिल्याच आठवड्यात भारतीय रूपया ८०.८७ कोटींची मिळकत केली. एकूण भारतीय रूपया २२५ कोटी कमावणारा दबंग हा बॉलिवूडमधील आजवरचा पाचवा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. २०१२ मध्ये दबंगचा दुसरा भाग दबंग २ काढण्यात आला ज्याला देखील प्रचंड यश मिळाले.

कलाकार

सलमान खान - चुलबुल पांडे

सोनाक्षी सिन्हा - रजो

अरबाज़ खान - मखंचंद "मक्खी" पांडे

विनोद खन्ना - प्रजापति पांडे

डिम्पल कपाडिया - नैनी देवी

सोनू सूद - छेदी सिंग

महेश मांजरेकर - हरिया

ओम पुरी - कस्तूरीलाल विश्कर्मा

अनुपम खेर - दयाल बाबु

माहि गिल - निर्मला

टीनू आनंद - मास्टरजी

मुरली शर्मा - एसीपी मलिक

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम महिला पदार्पण - सोनाक्षी सिन्हा
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - साजिद-वाजिद
  • सर्वोत्तम गीतकार - ललित पंडित
  • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - ममता शर्मा (मुन्नी बदनाम)

बाह्य दुवे