Jump to content

दत्ता केशव

दत्ता केशव कुलकर्णी (१९३३ - १८ जानेवारी, २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते.

गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे चित्रपटांच्या दुनियेत सन १९६४ साली आले. त्यांची कारकीर्द ४२ वर्षांची होती. हे अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे यांच्यासारख्या नामवंत मराठी दिग्दर्शकांचे समकालीन होते.

दत्ता केशव यांनी अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. याशिवाय त्यांनी अनेक नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता.

चित्रपट

  • अति शहाणा त्याचा...(दिग्दर्शन)
  • असेल माझा हरी...(दिग्दर्शन)
  • ओवाळिते भाऊराया (दिग्दर्शन)
  • कशाला उद्याची बात (दिग्दर्शन)
  • जन्मकुंडली (दिग्दर्शन)
  • जिद्द (दिग्दर्शन)
  • तुमचं आमचं जमलं (दादा कोंडके यांचा चित्रपट, दत्ता केशव यांची पटकथा)
  • दे टाळी (दिग्दर्शन)
  • धमाल बाबल्या गणप्याची (दिग्दर्शन)
  • नवरा माझा ब्रह्मचारी (दिग्दर्शन)
  • पोरींची धमाल बापाची कमाल (दिग्दर्शन, पटकथालेखन, संवादलेखन)
  • प्रेमासाठी वाट्टेल ते (दिग्दर्शन)
  • फटाकडी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • बाई मोठी भाग्याची (दिग्दर्शन)
  • बायांनो नवरे सांभाळा (दिग्दर्शन)
  • भिंगरी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • मला देव भेटला (दिग्दर्शन)
  • मीच तुझी प्रिया (दिग्दर्शन)
  • मोसंबी नारंगी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • येडा की खुळा (दिग्दर्शन)
  • येथे शहाणे राहतात (दिग्दर्शन)
  • राणीनं डाव जिंकला (दिग्दर्शन)
  • संत गजानन शेगावीचा (दिग्दर्शन)
  • सावली प्रेमाची (दिग्दर्शन)
  • सौभाग्याचं लेणं (दिग्दर्शन)

आत्मचरित्र

  • 'अपूर्णविराम' नावाचे आत्मचरित्र

पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२००१)
  • या शिवाय दहाहून अधिक पुरस्कार