दक्षिण चुंगचाँग प्रांत
दक्षिण चुंगचॉंग 충청남도 | |
दक्षिण कोरियाचा प्रांत | |
दक्षिण चुंगचॉंगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
राजधानी | हॉंगसॉंग |
क्षेत्रफळ | ८,६२८ चौ. किमी (३,३३१ चौ. मैल) |
लोकसंख्या | २०,२३,५३४ |
घनता | २४७ /चौ. किमी (६४० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | KR-44 |
संकेतस्थळ | www.chungnam.net |
दक्षिण चुंगचॉंग (कोरियन: 충청남도; संक्षेप: चुंगनम) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झालेला चुंगनम हा दक्षिण कोरियामधील सर्वात श्रीमंत प्रांत आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४७,५१६ अमेरिकन डॉलर असून येथील राहणीमानाचा दर्जा अमेरिकेपेक्षा उच्च आहे. येथील अर्थव्यवस्था २०१० साली १२.४ टक्क्याने वाढली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत