Jump to content

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया
대한민국
कोरियाचे प्रजासत्ताक
दक्षिण कोरियाचा ध्वजदक्षिण कोरियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Benefit broadly the human world
राष्ट्रगीत: "(애국가)
एगुक्गा
देशप्रेम गीत
दक्षिण कोरियाचे स्थान
दक्षिण कोरियाचे स्थान
दक्षिण कोरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सोल
अधिकृत भाषाकोरियन
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखयून सुक येओल
 - पंतप्रधानहान डक-सू
महत्त्वपूर्ण घटना
 - राष्ट्रीय स्थापना दिवस३ ऑक्टोबर, इ.स. पूर्व २३३३ 
 - स्वातंत्र्यघोषणा१ मार्च १९१९ 
 - अस्थायी सरकार१३ एप्रिल १९१९ 
 - मुक्तता१५ ऑगस्ट १९४५ 
 - संविधान१७ जुलै १९४८ 
 - सरकार स्थापना१५ ऑगस्ट १९४८ 
क्षेत्रफळ
 - एकूण १००,२१० किमी (१०९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 - २०१२ ५,००,०४,४४१[] (२५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४९१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५५६ अब्ज अमेरिकन डॉलर (१३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३१,७५३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८९७[] (अति उच्च) (१५ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनदक्षिण कोरियन वोन
आंतरराष्ट्रीय कालविभागकोरिया प्रमाणवेळ (यूटीसी + ९:००)
आय.एस.ओ. ३१६६-१KR
आंतरजाल प्रत्यय.kr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक८२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


दक्षिण कोरियाEn-us-South Korea.ogg उच्चार हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.

प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व चोसून घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश कोरियन साम्राज्य ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी जपानी साम्राज्य व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास सोव्हिएत संघाचा तर दक्षिण भागास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पाठिंबा होता. सोव्हिएत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धाची परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.

सध्या आशियामधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटनाजागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

अर्वाचीन इतिहास

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


दक्षिण कोरिया देश एक विशेष शहर, एक स्वायत्त विशेष शहर, सहा महानगरी शहरे, ८ प्रांत व एक स्वायत्त प्रांत अशा प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे.

कोडनावहांगुलहांजालोकसंख्या
विशेष शहर (특별시 特別市)
KR-11सोल서울 특별시서울特別市9,794,304
विशेष स्वायत्त शहर (특별자치도 特別自治道)
KR-??सेजॉंग세종 특별자치시世宗特別自治市122,263
महानगरी शहरे (광역시 廣域市)
KR-26बुसान부산 광역시釜山廣域市3,635,389
KR-27दैगू대구 광역시大邱廣域市2,512,604
KR-28इंचॉन인천 광역시仁川廣域市2,628,000
KR-29ग्वांगजू광주 광역시光州廣域市1,442,857
KR-30देजॉन대전 광역시大田廣域市1,456,308
KR-31उल्सान울산 광역시蔚山廣域市1,087,958
प्रांत (도 道)
KR-41ग्यॉंगी प्रांत경기도京畿道10,415,399
KR-42गंगवान प्रांत강원도江原道1,592,000
KR-43उत्तर चुंगचॉंग प्रांत충청북도忠清北道1,462,621
KR-44दक्षिण चुंगचॉंग प्रांत충청남도忠清南道1,840,410
KR-45उत्तर जेओला प्रांत전라북도全羅北道1,890,669
KR-46दक्षिण जेओला प्रांत전라남도全羅南道1,994,287
KR-47उत्तर ग्यॉंगसांग प्रांत경상북도慶尙北道2,775,890
KR-48दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत경상남도慶尙南道2,970,929
स्वायत्त प्रांत (특별자치도 特別自治道)
KR-49जेजू제주 특별자치도濟州特別自治道560,000

मोठी शहरे

क्रमांकशहरहांगुलहांजालोकसंख्या
(२०१०)
लोकसंख्या
(२००५)
लोकसंख्या
(२०००)
1 सोल서울특별시 서울(首爾)特別市 9,794,304 10,183,705 9,853,972
2 बुसान부산광역시 釜山廣域市 3,604,950 3,655,349 3,655,437
3 इंचॉन인천광역시 仁川廣域市 2,637,652 2,590,863 2,466,338
4 दैगू대구광역시 大邱廣域市 2,532,077 2,520,679 2,473,990
5 देजॉन대전광역시 大田廣域市 1,495,453 1,451,792 1,365,961
6 ग्वांगजू광주광역시 光州廣域市 1,469,293 1,402,446 1,350,948
7 उल्सान울산광역시 蔚山廣域市 1,081,985 1,084,882 1,012,110
8 सुवान 수원시 水原市 1,064,951 1,034,735 944,239
9 चांगवान 창원시 昌原市 1,062,731 504,118 515,619
10 सेओंग्नम 성남시 城南市 951,424 984,260 912,222

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

दक्षिण कोरियामधील वस्ती दाट आहे. येथे प्रतिवर्गकिलोमीटर ४८७ व्यक्ती राहतात. जगाच्या वस्तीदाटीपेक्षा ही संख्या दहापट आहे. १९७०-२००० सालांमध्ये देशातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतर झाले.[]

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

१९ डिसेंबर इ.स. २०१२ रोजी झालेल्या १८ व्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये पार्क-ज्यून-हे (Park Geun-hye) ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष निवडून आल्या.

अर्थतंत्र

खेळ

ताईक्वोंदो ह्या ऑलिंपिक खेळाचा उगम दक्षिण कोरियामध्येच झाला. फुटबॉलबेसबॉल हे देखील येथील लोकप्रिय खेळ आहेत. दक्षिण कोरियाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. राजधानी सोल हे १९८६ आशियाई खेळ१९८८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते तर २००२ आशियाई खेळ बुसानमध्ये भरवले गेले. जपानसोबत दक्षिण कोरियाने २००२ फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. आशिया खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यात २०१४ आशियाई खेळ दक्षिण कोरियामधील इंचॉन येथे तर २०१८ हिवाळी ऑलिंपिक प्यॉंगचॅंग येथे भरवले जातील.

संदर्भ

  1. ^ "Korea's Population: 50 million". National Statistics Office. 2012. August 8, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report" (PDF). United Nations. 2011. November 5, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "दक्षिण कोरिया". सीआयए कंट्री स्टडीझ (इंग्लिश भाषेत). २००६-०४-२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे