दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३ | |||||
श्रीलंका | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २२ ऑगस्ट – १९ सप्टेंबर १९९३ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | केप्लर वेसल्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला श्रीलंका दौरा होता. दोन्ही देशांनी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध १९६५ मध्ये मालिकाविजयानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२२ ऑगस्ट १९९३ धावफलक |
श्रीलंका १७९/५ (४१.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ५२/४ (१४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेचा डाव ४१.३ षटकांनंतर थांबविण्यात आला, दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द केला गेला.
- दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- पॅट सिमकॉक्स (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२ सप्टेंबर १९९३ (दि/रा) धावफलक |
दक्षिण आफ्रिका २२२/७ (५० षटके) | वि | श्रीलंका ९८ (३४ षटके) |
अँड्रु हडसन ४८ (८०) सनथ जयसूर्या ४/५३ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- पुबुदु दस्सानायके (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
४ सप्टेंबर १९९३ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका १९८/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १५४ (४६.१ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- हेमंत विक्रमरत्ने (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२५-३० ऑगस्ट १९९३ धावफलक |
श्रीलंका | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच कसोटी खेळली.
- पुबुदु दस्सानायके, पियाल विजेतुंगे (श्री), क्लाइव्ह एक्स्टीन आणि पॅट सिमकॉक्स (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
६-१० सप्टेंबर १९९३ धावफलक |
श्रीलंका | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- श्रीलंकेवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी विजय
- कुमार धर्मसेना (श्री) याने कसोटी पदार्पण केले.