Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज
दक्षिण आफ्रिका
तारीख१० जून – ३ जुलै २०२१
संघनायकक्रेग ब्रेथवेट (कसोटी)
कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०)
डीन एल्गार (कसोटी)
टेंबा बवुमा (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाजर्मेन ब्लॅकवूड (८८) क्विंटन डी कॉक (२३७)
सर्वाधिक बळीकेमार रोच (९) कागिसो रबाडा (११)
मालिकावीरक्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाइव्हिन लुईस (१७८) क्विंटन डी कॉक (२५५)
सर्वाधिक बळीड्वेन ब्राव्हो (१०) कागिसो रबाडा (७)
तबरेझ शम्सी (७)
मालिकावीरतबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली.

कसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. दुसरी कसोटी देखील १५८ धावांच्या फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय नोंदवला. २ऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज ने हॅट्रीक घेतली. केशव हा कसोटीमध्ये हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला. या आधी जॉफ ग्रिफिन ने २४ जून १९६० रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅट्रीक घेतली होती.

वेस्ट इंडीजने पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली खरी पण दुसऱ्या ट्वेंटी२०त दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. २९ जून २०२१ रोजी तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दिवंगत व्यवस्थापक गुलाम राजा यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिका संघ काळ्या पट्ट्या दंडाला बांधून मैदानात उतरला. दोन्ही संघांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तोच सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला. तबरेझ शम्सी याने दक्षिण आफ्रिकेचा विजय गुलाम राजांना समर्पित केला. लागोपाठ दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने २-१ ने आघाडी मिळवली. चौथा सामना वेस्ट इंडीजने जिंकत मालिका पुन्हा २-२ अश्या बरोबरीच्या टप्प्यात आणून ठेवली. पाचव्या आणि निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात एडन मार्करम याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.

१ली कसोटी

१०-१४ जून २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९७ (४०.५ षटके)
जेसन होल्डर २० (४१)
लुंगी न्गिडी ५/१९ (१३.५ षटके)
३२२ (९६.५ षटके)
क्विंटन डी कॉक १४१* (१७०)
जेसन होल्डर ४/७५ (२०.५ षटके)
१६२ (६४ षटके)
रॉस्टन चेस ६२ (१५६)
कागिसो रबाडा ५/३४ (२० षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६३ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)


२री कसोटी

१८-२२ जून २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स चषक
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९८ (११२.४ षटके)
क्विंटन डी कॉक ९६ (१६२)
काईल मेयर्स ३/२८ (१५ षटके)
१४९ (५४ षटके)
जर्मेन ब्लॅकवूड ४९ (१०६)
वियान मल्डर ३/१ (४ षटके)
१७४ (५३ षटके)
रेसी व्हान देर दुस्सेन ७५* (१४२)
केमार रोच ४/५२ (१३ षटके)
१६५ (५८.३ षटके)
कीरन पॉवेल ५१ (११६)
केशव महाराज ५/३६ (१७.३ षटके)
दक्षिण आफ्रिका १५८ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२६ जून २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६१/२ (१५ षटके)
रेसी व्हान देर दुस्सेन ५६* (३८)
फॅबियान ॲलन २/१८ (४ षटके)
इव्हिन लुईस ७१ (३५)
तबरेझ शम्सी १/२७ (४ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: पॅट्रीक गस्टर्ड (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

२७ जून २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६६/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५०/९ (२० षटके)
टेंबा बवुमा ४६ (३३)
ओबेड मकॉय ३/२५ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका १६ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि नायजेल दुगुईड (विं)
सामनावीर: जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

२९ जून २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६७/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६६/७ (२० षटके)
क्विंटन डी कॉक ७२ (५१)
ओबेड मकॉय ४/२२ (४ षटके)
इव्हिन लुईस २७ (२१)
तबरेझ शम्सी २/१३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका १ धावेने विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


४था सामना

१ जुलै २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६७/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४६/९ (२० षटके)
कीरॉन पोलार्ड ५१* (२५)
तबरेझ शम्सी २/१३ (४ षटके)
वेस्ट इंडीज २१ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: पॅट्रीक गस्टर्ड (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

३ जुलै २०२१
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६८/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४३/९ (२० षटके)
एडन मार्करम ७० (४८)
फिडेल एडवर्ड्स २/१९ (३ षटके)
इव्हिन लुईस ५२ (३४)
लुंगी न्गिडी ३/३२ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका २५ धावांनी विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • अकिल होसीन (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.